प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमात नव्याने सामील झालेला संघ अर्थात हरियाणाचा संघ. हरियाणा संघाने खूप मोजूनमापून त्याच्या संघातील खेळाडूंना विकत घेतले आहे पण बाकीचे संघही खेळाडूंना विकत घेण्यासाठी तत्पर असल्याचे त्यादिवशी या संघाला रिडींगमधील खूप मोठ्या नावांना संघासोबत करारबद्ध करता आले नाही असे वाटते.
वजीर सिंग संघात स्टार रेडर असणार आहे. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात पुणेरी संघाने करारबद्ध केलेला हा खेळाडू मागील दोन मोसम दुखापतीमुळे खेळू शकला नाही. हरियाणा संघाची रेडींगमधील सर्व दारोमदार ही प्रामुख्याने वजीरवरच असणार आहे. प्रो कबडीमध्ये खेळलेल्या २४ सामन्यात वजीरने १७८ गुण मिळवले आहेत तर त्यातील १६९ गुण त्याने रिडींगमध्ये मिळवले आहेत शिवाय ९ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत.
हरियाणा स्टीलर्स संघ रिडींग डिपार्टमेंटमध्ये थोडा कमकुवत भासत आहे, कारण वजीर सिंग हा खेळाडू सोडला तर स्टीलर्सकडे फक्त सुरजीत आणखी एक रेडर आहे ज्याने प्रो कबड्डीमध्ये चांगले नाव कमावले आहे.
स्टीलर्स संघाकडे उत्तम डिफेंडरची जोडी असून डिफेन्स या संघाची ताकद बनू शकते. संघात मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा ही प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी डिफेन्सिव्ह जोडी आहे. तर त्यांचा नेहमीच साथीदार जीवा गोपाल देखील हरियाणा संघात आहे. या संघाच्या रेडरने जर उत्तम कामगिरी केली तर हा संघ सेमी फायनलपर्यंत नक्की पोहचेल.
असा असेल हरियाणा स्टीलर्सचा संभाव्य संघ.
१ वजीर सिंग-रेडर
२ सुरजीत सिंग -रेडर
३ परमोद नरवाल -रेडर
४ जीवा गोपाल-लेफ्ट कव्हर
५ राकेश सिंग कुमार -राइट कव्हर
६ मोहीत चिल्लर-राइट कॉर्नर
७ सुरेंदर नाडा -लेफ्ट कॉर्नर