संपुर्ण नाव- अभिजीत वसंत काळे
जन्मतारिख- 3 जुलै, 1973
जन्मस्थळ- अहमदनगर, महाराष्ट्र
मुख्य संघ- महाराष्ट्र
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 3 ऑक्टोबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 10, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
थोडक्यात माहिती-
-उजव्या हाताचा फलंदाज अभिजीत काळे याने जरी त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला असला. तरी त्याला त्याच्या नकोश्या कामगिरीसाठी अधिक ओळखले जाते.
-अभिजीतला 2003 साली लाच घोटाळा प्रकरणात 6 महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले होते. त्याच्यावरती निवडकर्ता किरण मोरे आणि प्रणब रॉय यांनी भारतीय संघातील स्थानाबद्दल लाच देण्याप्रकरणी रंगेहात पकडले होते.
-एप्रिल 2003मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या टीव्हीएस वनडे चषकातून अभिजीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या 29व्या वर्षी त्याने त्याचा पहिला आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत अवघ्या 10 धावा केल्या होत्या.
-बॉम्बे संघात आपले स्थान पक्के न करू शकणारा अभिजीत 90च्या दशकात हा महाराष्ट्र संघाचा आधारस्तंभ होता. त्याने त्याच्या 93 प्रथम श्रेणी सामन्यात 54च्या सरासरीने 7134 धावा केल्या होत्या.
-त्याने पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यातच 132 धावांच्या खेळीने सुरुवात केली होती. मात्र, शेवटच्या हंगामात म्हणजेच 2004-05मध्ये तो त्रिपुरा संघात सामाविष्ट झाला.
-2000-01मध्ये अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध अभिजीतने 122 धावा केल्या. तर, 2001-02च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने उत्कृष्ट 284 धावा करण्याचा कारनामा केला.
-2009च्या केंट लीग सामन्यात लिंडन पार्ककडून खेळताना अभिजीतने डॅमियन ग्रॉसेलच्या षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. यावेळी त्या षटकात 3 नो बॉल्सचाही समावेश होता.
-डिसेंबर 2019साली अभिजीतने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना माजी महाराष्ट्र संघाचे कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या जागी अध्यक्षपद देण्यात आले.