संपुर्ण नाव- अजय रात्रा
जन्मतारिख- 13 डिसेंबर, 1981
जन्मस्थळ- फरिदाबाद, हरियाणा
मुख्य संघ- भारत आणि हरियाणा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 19 ते 23 एप्रिल, 2002
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 19 जानेवारी, 2002
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 163, शतके- 1
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 30, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-2002 साली जेव्हा भारतीय संघाला यष्टीरक्षक फलंदाजाची आवश्यकता होती. त्याकाळात हरियाणाच्या अजय रात्राला संघात संधी मिळाली होती.
-2000मधील अजयच्या 19 वर्षांखालील संघातील यशस्वी कामगिरीने त्याला ही संधी मिळाली होती.
-एप्रिल 2002मध्ये अजयने दिप दासगुप्ता यांच्या बदल्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी भारताने तब्बल 26 वर्षांनंतर या मैदानावर विजय मिळवला होता.
– या मालिकेच्या चौथ्या सामन्यात अजयने पहिल्या डावात नाबाद 115 धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीने तो कसोटीत शतक करणारा युवा यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता.
-तसेच कसोटीत 100 पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसराच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता.
-मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाल्याने त्याची जागा पार्थिव पटेलला देण्यात आली. त्यामुळे त्याने कसोटी कारकिर्दीत केवळ 6 सामने खेळले आणि यात 163 धावा केल्या.
-जानेवारी 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध अजयने त्याचा पहिला वनडे सामना खेळला. कसोटीप्रमाणे त्याला वनडेत विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याने 12 वनडे सामने खेळत अवघ्या 90 धावा केल्या होत्या.
-विशेष म्हणजे, अजयच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट 2002सालीच झाला.