संपुर्ण नाव- अजय कुमार शर्मा
जन्मतारिख- 3 एप्रिल, 1964
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -11 ते 15 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 2 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 53, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 31, धावा- 424, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 31, विकेट्स- 15, सर्वोत्तम कामगिरी- 3/41
थोडक्यात माहिती-
-अजय शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जरी उल्लेखनीय कामगिरी केली नसली. तरी, त्यांचे प्रथम श्रेणीतील विक्रम अविश्वसनीय आहेत. त्यांनी प्रथम श्रेणीत 67.46च्या सरासरीने 10हजाराहून अधिक धावा केल्या होत्या. डॉन ब्रॅडमन, विजय मर्चंट आणि जॉर्ज हेडले यांच्यानंतर एवढ्या सरासरीने 10हजारापेभा जास्त धावा करणारे ते चौथे फलंदाज होते.
-शिवाय त्यांनी प्रथम श्रेणीत 87 विकेट्स घेतल्या होत्या. ज्यातील 31 विकेट्स त्यांनी फिरकी गोलंदाजी करताना घेतल्या होत्या.
-त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे त्यांना दिल्ली संघाचे डॉन म्हटले जाते.
-शर्मा यांनी भारताकडून अवघा एक कसोटी सामना खेळला आहे. नरेंद्र हिरवानी आणि डब्ल्यूव्ही रमण यांच्यासह शर्मा यांनी 1988 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. पण, पुढे त्यांना एकाही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-शर्मा यांना वनडेत 31 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी 20च्या सरासरीने त्यांनी 494 धावा केल्या. पण, त्यांचा 90 हा स्ट्राईक रेट त्यावेळी अपवादात्मक होता.
-1991-92च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्यांनी दिल्ली संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
-मात्र, वयाच्या 36व्या वर्षी म्हणजेच 2000 साली मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावरती आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली. तरी, सप्टेंबर 2014मध्ये त्यांच्यावरील आरोप खोटे ठरल्याने त्यांना निर्दोष ठरवण्यात आले.
-शर्मा यांचा मुलगा मनन शर्मा हा देखील क्रिकेटपटू आहे. त्याचा 19 वर्षांखालील भारतीय संघात समावेश होता. तसेच दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सकडूनही तो खेळला आहे.