संपुर्ण नाव- अमित भंडारी
जन्मतारिख- 1 ऑक्टोबर, 1978
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत आणि दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 3 जून, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/31
थोडक्यात माहिती-
-अमित भंडारी यांनी वयाच्या 22व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आतंरराष्ट्रीय स्वरुपातील केवळ वनडे क्रिकेट खेळले होते. त्यांना कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही.
-2000 साली ढाका येथील पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक सामन्यातून अमित भंडारी यांनी वनडेत पदार्पण केले. यावेळी त्यांनी 10 षटके गोलंदाजी करत 75 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांना 4 वर्षे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-परंतु, 2001-02 च्या रणजी ट्रॉफी हंगामातील त्यांच्या 30 विकेट्सने पुन्हा त्यांच्या वनडे पुनरागमनाची दारे खुली केली होती.
-शेवटी 2004 साली झिम्बाब्वेविरुद्धचा वनडे सामना खेळण्याची त्यांना संधी मिळाली. मात्र, या सामन्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम लागला.
-भंडारी हे जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकू शकले नसले. तरी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी इंग्लंड दौऱ्यावर भारत अ संघाकडून खेळताना केली होती. यावेळी ते सर्वात जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.
-त्यांची प्रथम श्रेणीतील कामगिरीही उल्लेखनीय होती. त्यांनी प्रथम श्रेणीत 26.78 च्या सरासरीने 314 विकेट्स घेतल्या होत्या.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर भंडारी हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएसनचे मुख्य निवडकर्ता होते.
-11 फेब्रुवारी 2019 साली ते जेव्हा निवडकर्ता होते. त्यावेळी 23 वर्षांखालील काही क्रिकेटपटूंची संघात निवड न केल्यामुळे त्यांनी भंडारी यांना मारहान केली होती. त्यामुळे त्यांना दिल्ली येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढे काही दिवसातच ते बरे झाले.
-दिल्ली येथे भंडारी यांची स्वत:ची क्रिकेट अकॅडमीदेखील आहे.