संपुर्ण नाव- अमित मिश्रा
जन्मतारिख- 24 नोव्हेंबर, 1982
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, चंदिगड, डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेविल्स, हरियाणा, इंडिया ए, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, उत्तर विभाग, ऑएल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, शेष भारतीय संघ आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (लेगब्रेक)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 17 ते 21 ऑक्टोबर, 2008
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 13 एप्रिल, 2003
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 13 जून, 2010
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 22, धावा- 648, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 22, विकेट्स- 76, सर्वोत्तम कामगिरी- 5/71
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 36, धावा- 43, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 36, विकेट्स- 64, सर्वोत्तम कामगिरी- 6/48
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 16, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
थोडक्यात माहिती-
-अमित मिश्रा हा भारतीय रेल्वेतील सेवानिवृत्त सैनिक एसएम मिश्रा यांचा मुलगा आहे. त्याचा भाऊ संजय मिश्रा हा एसएम सिस्टमचा डायरेक्टर आहे.
-मिश्राला मिशी असे टोपननावदेखील आहे.
-मिश्राने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 152 सामन्यात 29.17च्या सरासरीने 535 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय तो फलंदाजीतही माहिर होता. त्याने 21.75च्या सरासरीने 4176 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 17 अर्धशतकांचा आणि एका द्विशतकाचा समावेश होता.
-2002साली वेस्ट इंडिजविरुद्ध मिश्राला कसोटी खेळण्याची संधी मिळाली खरी, पण त्याचा संघातील 11 जणांमध्ये समावेश नव्हता.
पुढे 2008साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. यावेळी त्याला अनिल कुंबळेच्या बदल्यात संघात घेण्यात आले होते. मिश्राने या पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
यामुळे वामन कुमार (1961) आणि नरेंद्र हिरवानी (1988) यांच्यानंतर पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा तो तिसरा लेग-स्पिनर ठरला होता.
-मिश्राने 10 टी20 सामन्यात 13.71च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर देशांतर्गत टी20मध्येही तरबेज होता. यात त्याने 229 सामन्यात 253 विकेट्स घेतल्या आहेत.
-मिश्राने 2013ला झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्याच्या वनडे मालिकेत सर्वाधिक 18 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला होता. यात त्याने 2 वेळा एका डावात घेतलेल्या 5 विकेट्सचा समावेश होता. याचवेळी त्याने 48 धावा देत 6 विकेट्स घेण्याचाही कारनामा केला होता.
शिवाय यासह त्याने द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वोत्कृष्ट विकेट घेणाऱ्या फिरकीपटू जवागल श्रीनाथ यांचाही विक्रम मोडला होता.
-2 फेब्रुवारी 2014ला मिश्राने पाकिस्तानी फलंदाजाच्या 28 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी 10 षटके गोलंदाजी केली होती. त्यांची ही आकडेवारी आशिया चषकातील सर्वोत्कृष्ट सहाव्या क्रमांकाची आकडेवारी होती.
-17 एप्रिल 2013 म्हणजेच आयपीएलचा 6वा हंगाम. यावेळी सनराइजर्स हैद्राबाद विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडियामधील सामन्यात मिश्राने हॅट्रिक घेतली होती. यासह आयपीएल इतिहासात 3 हॅट्रिक घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. त्याने 2008मध्ये दिल्ली डेअरडेविल्स आणि 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून हॅटट्रिक घेतली होती.
-2015 मध्ये हॉटेलच्या खोलीत एका महिलेवरती शारीरिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात त्याला बेंगलोर पोलिसांनी अटक केली होती. त्याला नंतर जामिन देऊन सोडवण्यात आले.