संपुर्ण नाव- अंशुमन दत्ताजीराव गायकवाड
जन्मतारिख- 23 सप्टेंबर, 1992
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत आणि बडोदा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे फिरकीपटू गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 27 डिसेंबर, 1974 ते 1 जानेवारी, 1975
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 7 जून, 1975
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 1985, शतके- 2
गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/4
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 15, धावा- 269, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 15, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/39
थोडक्यात माहिती-
-अंशुमन गायकवाड हे मुळात क्रिकेट खेळणाऱ्या कुटुंबातील होते. त्यांच्यापुर्वी त्यांचे वडील दत्ता गायकवाड यांनी बडोदा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. तसेच, गायकवाड घराणाच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा अंशुमन मुलगा शत्रुंजय यानेही बडोदाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
-गायकवाड यांनी 1975ला इडन गार्डन कोलकाता येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते.
-विशेष म्हणजे खूप कमी क्रिकेटपटूंना अशी संधी मिळते की त्यांची क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी होतो. यात गायकवाड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गायकवाड यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याच मैदानावर खेळला होता, ज्या मैदानावरून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. डिसेंबर 1984ला इंग्लंडविरुद्ध त्यांनी शेवटचा कसोटी सामना कोलकाता येथे खेळला होता.
-गायकवाड यांच्यामध्ये एकाग्रता आणि संयम हे चांगले गुण होते. ज्याचा त्यांना क्रिकेट क्षेत्रात पुरेपुर उपयोग झाला. 1982-83 च्या कसोटीत त्यांनी पाकिस्तानविरुद्ध जलंदर येथे सलग 671 मिनिट्स फलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी कारकिर्दीतील सर्वाधिक 201 धावा केल्या होत्या. कसोटीतील त्यांचे हे द्विशतक हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात धीम्यागतीने केलेले द्विशतक ठरले होते.
🔹 55 matches
🔹 2254 international runs
🔹 Former two-time coach of the Indian teamWishing Anshuman Gaekwad a happy birthday 🎂 pic.twitter.com/AEQmtgtlXq
— ICC (@ICC) September 23, 2021
-त्याकाळातील क्रिकेटपटू खेळताना सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देत नव्हते. म्हणजेच हेल्मेटचा अधिक वापर करत नव्हते. या गोष्टीचे नुकसान गायकवाड यांना भोगावे लागले होते. 1975-76मध्ये जमैका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ते 81 धावांवर फलंदाजी करत असताना विडिंजचे मायकल होल्डिंग गोलंदाजी करत होते. मायकल यांनी टाकलेल्या बाउन्सरचा ते सामना करू शकले नाहीत आणि चेंडू येऊन त्यांच्या कानाला लागला. त्यावेळी त्यांना खूप गंभीर दुखापत झाली होती. त्यांना 48 तासासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. कानाच्या दुखापतीसाठी त्यांना शस्त्रक्रियाही करावी लागली.
-40 कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना गायकवाड हे सर्वाधिक वेळा सुनील गावसकर यांच्या सोबत सलामीला फलंदाजीला आले आहेत.
In his 40 Tests for India, he spent most of it as Sunil Gavaskar's partner, grinding away to 1,985 runs. Happy Birthday to Anshuman Gaekwad! pic.twitter.com/qGF981jZj5
— ICC (@ICC) September 22, 2016
-गायकवाड यांना पर्यटनसाठी चेन्नई हे ठिकाण खूप आवडते. चेन्नईतील महाबलीपुरम हे त्यांचे आवडते ठिकाण आहे.
-गायकवाड यांनी दोन वेळा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली आहे. 1997-99 आणि 2000 अशा दोन काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsAUS: दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस बनू शकतो ‘विलन’, सामना रद्द होण्याची चिन्हे
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा