संपुर्ण नाव- आर्शद आयुब
जन्मतारिख- 2 ऑगस्ट, 1958
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -25 ते 29 नोव्हेंबर, 1987
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 8 डिसेंबर, 1987
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 13, धावा- 257, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 13, विकेट्स- 41, सर्वोत्तम कामगिरी- 5/50
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 32, धावा- 116, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 32, विकेट्स- 31, सर्वोत्तम कामगिरी- 5/21
थोडक्यात माहिती-
-आर्शद आयुब हे हैद्राबादमधून भारतीय संघाला मिळालेले चौथे फिरकीपटू होते. त्यांच्यापुर्वी गुलाम अहमद, शिवलाल यादव आणि वेंकटपथी राजू हे हैद्राबादमधील फिरकीपटू गोलंदाज भारताला मिळाले होते.
-1987 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणारे आयुब यांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगला कारनामा केला होता. त्यांनी या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या होत्या.
-13 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत आयुब यांनी 3 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याकाळात उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा 2वेळा केला होता.
-केवळ गलंदाजी नव्हे तर, फलंदाजीतही आयुब यांनी दमदार कामगिरी केली होती. प्रथम श्रेणीत त्यांनी केलेल्या द्विशतकांची नोंद आहे. यात 1987च्या बिहार विरुद्धच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्यातील द्विशतकाचाही समावेश होता. त्यांनी 8व्या क्रमांकावर फलंदाजी करत 206 धावांची मोठी खेळी करत हैद्राबाद संघाला विजय मिळवून दिला होता.
-ते एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर, त्यांनी दिल्ली विरुद्धच्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात 174 धावांची खेळी करत हैद्राबाद संघाला चषक जिंकून दिले होते.
-1994 साली आयुब यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 1998 साली त्यांनी हैद्राबाद येथे आयुब क्रिकेट अकॅडमीची स्थापना केली.
-2010 साली ते हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. 2014 साली पुन्हा त्यांना अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला.
-आयुब हे बऱ्याच वेळा भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यांची 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धला झालेल्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली होती.