वाढदिवस विशेष : मराठीत माहिती – क्रिकेटर आशिष नेहरा

संपुर्ण नाव- आशिष दिवान सिंग नेहरा

जन्मतारिख- 29 एप्रिल, 1979

जन्मस्थळ-  दिल्ली

मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, दिल्ली, दिल्ली डेअरडेविल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 24 ते 28 फेब्रुवारी, 1999, ठिकाण – कोलंबो

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 24 जून, 2001, ठिकाण – हरारे

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 9 डिसेंबर, 2009, ठिकाण – नागपूर

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 17, धावा- 77, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 17, विकेट्स- 44, सर्वोत्तम कामगिरी- 4/72

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 120, धावा- 141, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 120, विकेट्स- 157, सर्वोत्तम कामगिरी- 6/23

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 27, धावा- 28, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 34, सर्वोत्तम कामगिरी- 3/19

थोडक्यात माहिती-

-आशिष दिवान सिंग नेहरा उर्फ नेहराजी हा भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

-नेहराची पत्नी रुश्मा नेहरा ही त्याला पहिल्यांदा ओव्हल स्टेडियममध्ये भेटली होती. विशेष म्हणजे रुश्मा क्रिकेटप्रेमी आहे, तसेच तिला क्रिकेटचे बरेचसे ज्ञान आहे. ती केव्हा स्लोअर आणि केव्हा यॉर्कर टाकायचा हेदेखील ती नेहराला सांगत असते.

-त्यांना अरायना ही मुलगी आणि आरुष हा मुलगा आहे.

-रुश्माने नेहराला आयफोन 7 भेट देईपर्यंत तो नोकिया ई51 हा मोबाईल वापरत होता. खूप प्रयत्नांनंतर नेहराला त्याच्या नव्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आता वापरता येत आहे. नाहीतर तो मोबाईलचा वापर जास्त तर कॉलसाठी करत असतो.

-2001 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणाऱ्या नेहराने खूप लवकर नावलौकिक मिळवला.

-2003मध्ये तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज होता. यावेळी त्यांच्या गोलंदाजीचा वेग 149.7 किलोमीटर प्रती तास इतका होता.

-त्याने 2003 सालच्या वनडे विश्वचषक सामन्यात इंग्लंडविरुद्ध 23 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची हे प्रदर्शन भारतीय गोलंदाजाने केलेली विश्वचषकात केलेले सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन आहे.

– नेहराने 2005च्या कोलंबो येथील श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 59 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. यासह नेहरा हा एकमेव असा भारतीय गोलंदाज आहे ज्याने वनडेत 2वेळा 6 विकेट्स घेतल्या आहेत.

-2010मध्ये ट्वेन्टी20 विश्वचषकामधील खराब कामगिरीनंतर नेहरा त्याच्या इतर 5 संघसहकाऱ्यांसोबत पबमध्ये गेला होता. तेव्हा काहींनी एवढ्या खराब कामगिरीनंतर कोण पबमध्ये कसं जाऊ शकत असे म्हटल्यामुळे वाद झाला होता. त्यावेळी नेहरासोबत इतर 5 खेळाडू वादात अडकले होते.

-नेहराने आतापर्यंत 5 संघाकडून आयपीएल खेळले आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात तो मुंबई इंडियन्स संघामध्ये होता. त्यानंतर पुढील 2 मोसम त्याने दिल्ली डेअरडेविल्समध्ये घालवली. 2011 आणि 2012 मध्ये तो पुणे वॉरियर्स तर 2013मध्ये पुन्हा दिल्ली डेअरडेविल्समध्ये होता. 2014 साली त्याची चेन्नई सुपर किंग्समध्ये निवड झाली होती. तर, 2016पासून तो सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग होता.

-नेहरा आतापर्यंत 35हून अधिक क्रिकेट क्लबचा भाग राहिला आहे. त्यामुळे असे करणाऱ्या खूप कमी क्रिकेटपटूंमध्ये त्याचेही नाव आहे.

-2015 साली नेहराने आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 22 विकेट्स घेतल्या होत्या.

-तसेच 2016मधील सनराइजर्स हैद्राबादने मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदामध्येही त्याचा मोठा हात होता. यावेळी 8 सामन्यात त्याने 22.11च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या होत्या.

-2015-16मध्ये नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनानंतर उत्तम कामगिरी केली. 2016च्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यातही त्याचे योगदान होते.

-त्याने 2016मध्ये एकूम 15 टी20 सामने खेळले होते. यात मायदेशातील आयसीसी ट्वेंटी20 विश्वचषकाचाही समावेश होता. यावेळी त्याने 20.66च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या होत्या.

-नेहराला त्याच्या दुखापतींमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्याच्या दीर्घकालीन दुखापतींमुळे त्याला 17 वर्षांच्या कारकिर्द अवघे 2 विश्वचषक आणि 2 टी20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यावर एकूण १२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

-त्याच्या दुखापतींमुळे युवराजने त्याला मजेशीर कमेंटही केली होती. तो म्हणाला होता की, नेहराला झोपेतहा दुखापत होऊ शकते.

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.