संपुर्ण नाव- बलविंदर सिंग संधू
जन्मतारिख- 3 ऑगस्ट, 1956
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 14 ते 19 जानेवारी, 1983, ठिकाण – हैद्राबाद
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 3 डिसेंबर, 1982, ठिकाण – गुजरानवाला
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 214, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 71 धावा
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/87
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 22, धावा- 51, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – नाबाद 16 धावा
गोलंदाजी- सामने- 22, विकेट्स- 16, सर्वोत्तम कामगिरी- 3/27
थोडक्यात माहिती-
-बलविंदर सिंग संधू यांचे वडील हरनामसिंग नाझ हे पंजाबी कवी होते. जे एलआयसी एजेंटचे काम करत होते. हरनामसिंग हे तरूण असताना त्यांच्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहायला जायचे. त्यामुळे संधू यांना प्रेरणा मिळायची.
-संधू यांची बहीण परमजित कौर यांचे साजन सिंग चिमा यांच्याशी लग्न झाले. त्यांनी भारताकडून बास्केटबॉल खेळले होते. शिवाय 1999साली त्यांच्या बास्केटबॉलमधील योगदानासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ते आता पंजाबी पोलिस अधीक्षक आहेत.
-रमाकांत आचरकर यांनी अनेक भारतीय क्रिकेटपटूंना घडवले आहे. सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी यांच्यासह संधू यांचेंही या यादीत नाव आहे. संधू हे उन्हाळी कॅम्पमध्ये क्रिकेटच्या शिवाजी पार्क मैदानावर सराव करत होते, तेव्हा आचरकर यांचे प्रशिक्षण त्यांना लाभले होते.
-1980-81मध्ये जेव्हा कारसन घावरी रणजी ट्रॉफी सोडून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात सामील झाले होते, तेव्हा संधू यांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. सुरुवातीचे 2 सामने त्यांना खेळायला मिळाले नाहीत. मात्र, त्यांनी गुजरातविरुद्धच्या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या.
-शिवाय ते दिल्लीविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाचा सुरुवातीला भाग नव्हते, मात्र शेवटच्या क्षणाला जेव्हा रवी कुलकर्णी हे मुंबई संघातून बाहेर पडले, तेव्हा संधू यांना खेळण्यास सांगण्यात आले होते.
-संधू हे सुरुवातीपासूनच चांगले गोलंदाज होते. मात्र, त्यांनी कसोटीत त्यांच्या फलंदाजी कौशल्याची झलक दाखवून दिली होती. त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 88 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 71 धावा केल्या होत्या. ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती.
-शिवाय यावेळेला 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत त्यांनी केलेल्या धावांमुळे, कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 9व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला होता.
-1983मध्ये वेस्ट इंडिजचे गोलंदाज मिचेल होल्डिंग, जोएल गोरनर, मॅकलम मार्शल आणि ऍन्डी रॉबर्ट यांच्या गोलंदाजीविरुद्ध संधू यांनी 9 व्या क्रमांकावर 68 धावांचीही खेळी केली होती.
-1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही संधू भाग होते. त्यांच्यासाठी हा विश्वचषक खूप महत्त्वाचा ठरला होता. त्यांनी यातील काही आठवणी त्यांनी द डेव्हिल्स पॅक या पुस्तकात लिहिल्या आहेत.
-ऑस्टिन कॉटिन्हो संधू यांचे जवळचे मित्र यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.