---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर बरिंदर श्राण

On: बुधवार, जून 3, 2020 8:37 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- बरिंदर बलबीरसिंह श्राण

जन्मतारिख- 10 डिसेंबर, 1992

जन्मस्थळ- सिरसा

मुख्य संघ- भारत, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैद्राबाद

फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 12 जानेवारी, 2016, ठिकाण – पर्थ

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 20 जून, 2016, ठिकाण – हरारे

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 3/56

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 4/10

थोडक्यात माहिती-

-बरिंदर श्राण यांचा जन्म हरियाणातील सिरसाजवळील पन्नीवाला मोरिका या गावी झाला. त्याचे वडिल हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 6 एकर शेती आहे.

-बरिंदरला सुरुवातीला बॉक्सिंगमध्ये खूप रुची होती. तो सुरुवातीला गावच्या सतिश कुमार या प्रशिक्षकांकडून भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत होता. कुमार यांनी नंतर बरिंदरला प्रशिक्षक जगदिश सिंग यांच्याशी भेटवले. जगदिश यांनी ऑलम्पिक विजेता विजेंदर सिंग याला प्रशिक्षण दिले होते.

-बरिंदरला आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळण्यास बोलावले गेले होते. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. पुढे तो चंदिगडमधील केके क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे बेसिक नियम शिकला.

-बरिंदरला दुबईतील आयसीसी अकादमीतही सरावाची संधी मिळाली.

-मोहालीत आंतर-जिल्हा क्रिकेट स्पर्धेत खेळल्यानंतर, बरिंदरला 2011मध्ये पंजाबकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंजाबचे प्रशिक्षक विक्रम राथोर हे होते.

-दुखापतीमुळे बरिंदर पूर्ण एक हंगाम क्रिकेटपासून दूर होता. पुढे आयपीएलच्या 8व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने त्याला 10 लाख रुपयांना विकत घेतले होते.

-2015-16 या संपूर्ण प्रथम श्रेणी हंगामात बरिंदरने पंजाबकडून 25 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पुढे विजय हजारे ट्रॉफीत 6 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या होत्या.

-अखेर 2016मध्ये बरिंदरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत आणि झिम्बाब्वेविरुद्ध टी20त पदार्पण केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---