संपुर्ण नाव- भारत अरूण
जन्मतारिख- 14 डिसेंबर, 1962
जन्मस्थळ- विजयवाडा, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख -17 ते 22 डिसेंबर, 1986
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 24 डिसेंबर, 1986
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 4, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 3/76
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 21, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/43
थोडक्यात माहिती-
-अरूण यांचे पूर्ण नाव भारती अरूण असे आहे. परंतु, क्रिकेट क्षेत्रात आल्यानंतर त्यांचे नाव भारत अरूण असे नोंदवण्यात आले.
-त्यांचे वडील व्ही.एस. भारती यांना 4 मुले आहेत. अरूण यांचे सर्वात मोठे भाऊ रमेश हे टाइम्स ऑफ इंडिया फायनन्सचे उपाध्यक्ष आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ सुरेश हे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.
-तर, सर्वात लहान भाऊ आनंद हे अभिनेता आहेत. त्यांनी तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि काही कन्नड चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ते काही मल्याळम आणि तमिळ भाषेतील मालिकेमध्येही काम करतात.
-अरूण भारत हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू होते.
-त्यांनी 48 प्रथम श्रेणी सामन्यात 30.59च्या सरासरीने 1652 धावा केल्या होत्या. यात त्यांच्या 3 शतकांचा समावेश होता. तर, त्यांनी 32.44च्या सरासरीने 110 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यांनी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये 1982चा इंग्लंडविरुद्धचा एकमेव सामना खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार रवि शास्त्री हे होते.
-अरुण हे त्या क्रिकेटपटूंपैकी एक होते त्यांनी त्यांचे कसोटी आणि वनडे पदार्पण एकाच मैदानावर एकाच महिन्यात केले आहे. डिसेंबर 1986मध्ये त्यांनी कानपुर येथील मोदी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यतून कसोटी आणि वनडेत पदार्पण केले होते. त्यांच्यापुर्वी महिंदर सिंग यांनीही असा कारनामा केला होता.
-1992 साली अरुण यांनी क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.
-त्यानंतर 2002साली त्यांच्या प्रशिक्षण कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी 4 वर्षे तमिळनाडू संघाचे प्रशिक्षण केले. यादरम्यान 2003-2004च्या हंगामात त्यांनी तमिळनाडूला रणजी ट्रॉफीत विजय मिळवून दिला.
-पुढे 2008 साली ते राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे गोलंदाजी प्रशिक्षक बनले.
-2012 साली त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. तर, 2014 साली 19 वर्षांखालील भारतीय संघ उपांत्यपूर्व सामन्यात पोहोचला होता.
-2015 साली त्यांची आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
-झहीर खान आणि राहूल द्रविड यांच्यानंतर ऑगस्ट 2014मध्ये अरुण यांची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून ते भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.








