संपुर्ण नाव- देवांग जयंत गांधी
जन्मतारिख- 6 सप्टेंबर, 1971
जन्मस्थळ- भावनानगर, गुजरात
मुख्य संघ- भारत, बंगाल, एसेक्स क्रिकेट बोर्ड आणि किंग्स इलेव्हन पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 10 ते 14 ऑक्टोबर, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 17 नोव्हेंबर, 1999
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 204, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 49, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-देवांग गांधी हे उजव्या हाताचे फलंदाज आहेत. मात्र बाउन्सर्स गोलंदाजी ही त्यांची कमजोरी होती आणि बऱ्याच गोलंदाजांना हे कळल्यामुळे गांधी यांची क्रिकेट कारकिर्द लवकर संपली. पण त्यांनी त्यांच्या छोट्याश्या कारकिर्दीतही उल्लेखनीय खेळी केली होती.
-गांधी यांनी बंगाल संघाकडून त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात आणि शेवटही केला. त्यांच्या योगदानामुळे बंगालने 2004 सालचा देओधर ट्रॉफीही जिंकली होती.
-गांधी यांनी 1998-99 साली बंगालकडून प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतकी (323) खेळी करण्याचा कारनामा केला होता. त्यांच्यानंतर आजपर्यंत कोणत्याच फलंदाजाने बंगालकडून त्रिशतक केलेले नाही.
-रणजी सामन्याच्या एक दिवशी आधी मोठ्या मनाच्या गांधींनी बंगालच्या एका भावी क्रिकेटपटूला आपले स्थान दिले होते. हा क्रिकेटपटू त्यांचा स्पोर्टिंग युनियनचा मित्र होता. तो म्हणजे अभिषेक झुनझुनवाला.
-गांधी यांच्या न्यूझीलंड संघाशी अनेक आठवणी जुळलेल्या आहेत.
-न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली होती. यावेळी त्यांनी 2 अर्धशतके ठोकली. पण पुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढेही त्यांची फलंदाजी कोलमडली. त्यामुळे त्यांच्या कसोटी कारकिर्दीचा अवघ्या 3 महिन्यातच अंत झाला.
-पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले होते. असे असले तरी, त्यांनी दुसऱ्या डावात 75 धावांची खेळी करत सदागोपन रमेश यांच्यासह 126 धावांची भागिदारी केली होती.
– 1999-2000ला न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात गांधी यांनी सौरव गांगुली यांच्यासोबत सलामीला फलंदाजी केली होती. मजेशीर बाब अशी की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंगालच्या फलंदाजांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळाली होती.
-गांधी यांनी निवृत्तीनंतर बंगाल येथे त्यांची स्वत:ची क्रिकेट अकॅडमी काढली. जेणेकरून तेथील युवा खेळाडूंना क्रिकेटसाठीचे आवश्यक वातावरण मिळावे.