---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर दिलीप दोषी

On: बुधवार, मार्च 25, 2020 12:40 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- दिलीप रसिकलाल दोषी

जन्मतारिख- 22 डिसेंबर, 1947

जन्मस्थळ- राजकोट, गुजरात

मुख्य संघ- भारत, बंगाल, सौराष्ट्र, हर्टफोर्डशायर, वार्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायर

फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 11 ते 16 सप्टेंबर, 1979, ठिकाण – चेन्नई

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 डिसेंबर, 1980, ठिकाण – मेलबर्न

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 33, धावा- 129, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 33, विकेट्स- 114, सर्वोत्तम कामगिरी- 6/102

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 15, धावा- 9, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 15, विकेट्स- 22, सर्वोत्तम कामगिरी- 4/30

थोडक्यात माहिती-

-दिलीप दोषी यांचा राजकोट येथे जन्म झाला पण ते कोलकाता येथे वाढले. कारण त्यांच्या वडीलांनी पुढे कोलकाता येथे व्यावसायाला सुरुवात केली होती. दोषी यांना नरेन आणि परिमल असे 2 भाऊ आहे. तर वसुंधरा ही बहिण आहे. जेव्हा ते क्रिकेट खेळायचे तेव्हा ते नरेन यांना गोलंदाजी करायचे.

-कोलकाता येथे पावसाळी दिवसात क्रिकेट सराव केला जात नाही. यासाठी दोषी पहिल्यांदाच सरावाच्या कारणाने मुंबईला गेले होते. ते हंगामी क्रिकेट किंवा कांगा लीग खेळू शकतील या आशेने मुंबईला गेले होते. त्यांना भारतीय क्रिकेट क्लबमध्ये संधी मिळाली होती. पण बऱ्याचदा त्यांना राखीव खेळाडू म्हणून खेळवण्यात आले होते

– जमसाहेब शत्रुशल्यसिंहजी यांच्या मदतीने दोषी यांना ससेक्स संघासोबत सराव करायला मिळाला. तसेच त्यांनी काही सामने खेळले होते. यावेळी त्यांची सर गॅरी सोबर्स यांच्यांशी भेट झाली होती. त्यावेळी दोषींनी एका सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. यावर, सोबर्स यांनी त्यांची प्रशंसाही केली होती.

-तसेच, त्यांनी 1977मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून काउंटीमध्ये पदार्पण केले होते आणि मजेशीर गोष्ट अशी की पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी बिशनसिंग बेदी यांना बाद केले होते.

-1979मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली होती. यावेळी ते इंग्लंड दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांना चेन्नई येथे जाण्यासाठी खूप गडबड झाली होती आणि ते त्यांची बॅगही विसरले होते. तरीही ते कसेबसे वेळेवर चेन्नईत पोहोचले होते.

-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यातच दोषी यांनी 8 विकेट्स घेतल्या होत्या.

-त्यांच्या कारकिर्दीतील गोलंदाजीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी 1982च्या मॅंचेस्टर येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत केली होती. यावेळी त्यांनी 102 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

-दोषी यांना कसोटीत नाव कमावण्यासाठी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत वाट पहावी लागली. त्यांनी 33 कसोटी सामने खेळत 114 विकेट्स घेतल्या.

-दोषी यांचा मुलगा नयन दोषी हा देखील क्रिकेटपटू असून हा डाव्या हाताचा फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने सौराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत. तसेच त्याने डर्बिशायर संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचाही भाग होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---