संपुर्ण नाव- गगन किशनलाल खोडा
जन्मतारिख- 24 ऑक्टोबर, 1974
जन्मस्थळ- बाडमेर, राजस्थान
मुख्य संघ- भारत, राजस्थान आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 14 मे, 1998
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 115, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-गगन खोडा याला आर्यमान आणि आर्यवीर अशी 2 मुले आहेत.
-खोडाने राजस्थान आणि मध्य विभाग संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. 1991-92साली राजस्थानकडून रणजी ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 116 धावा केल्या होत्या. 34 हंगामानंतर कोणत्या क्रिकेटपटूने राजस्थानकडून पदार्पणाच्या सामन्यात एवढ्या धावा केल्या होत्या.
-1994-95ला त्याने 237 धावांची खेळी करत आपले कौशल्य दाखवून दिले होते.
-खोडाने 132 प्रथम श्रेणी सामन्यात 8516 धावा केल्या. विशेष म्हणजे, यात 20 शतकांचा समावेश होता.
-खोडा हा त्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्याने कोका कोला तिरंगी मालिका खेळली आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 1998ला बांग्लादेशविरुद्धच्या वनड सामन्यातून झाली. यावेळी त्याने अवघ्या 26 धावा केल्या.
-तसेच केन्याविरुद्धच्या वनडेत त्याने 89 धावा करत सलामीवीर पुरस्कारही पटकावला होता.
-1998साली मलेशियामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्येही तो खेळला. पण त्याला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही.
-2000-01 साली दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाविरुद्ध खोडाने 10 तास नाबाद 300 धावांची खेळी केली होती.
-9 नोव्हेंबर 2015ला त्याची राष्ट्रीय निवडकर्ता पदी निवड झाली. तेथे मध्य विभागाच्या निवड समितीचे काम तो पहातो.