---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर गोपाळ बोस

On: बुधवार, मार्च 18, 2020 10:12 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- गोपाळ कृष्ण बोस

जन्मतारिख- 20 मे, 1947

जन्मस्थळ- कलकत्ता (आता कोलकाता), बंगाल

मृत्यू- 26 ऑगस्ट, 2018

मुख्य संघ- भारत आणि बंगाल

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 15 जुलै ते 16 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 1, धावा- 13, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/39

थोडक्यात माहिती-

-कोलकाता येथे जन्माला येणारे गोपाल बोस हे कोलकाता विद्यापिठात नोकरी करत होते. तेथूनच त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी बिहार विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी बंगाल संघाकडून 3 डाव खेळताना त्यांची फलंदाजी कामगिरी उल्लेखनीय झाली नव्हती. मात्र, त्यांनी त्याच डावात उत्तम गोलंदाजी करत 14 विकेट्स घेतल्या होत्या.

-पुढे त्यांनी कारकिर्दीत एकूण 78 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यातील जास्तीत जास्त सामने त्यांनी बंगालकडून खेळले. यावेळी सुरुवातीला चांगले फलंदाजी प्रदर्शन न करू शकणारे बोस पुढे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बनले. त्यांनी प्रथम श्रेणीत 30.79च्या सरासरीने 3757 धावा केल्या होत्या. तर, 26.97च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या होत्या.

-बोस यांनी 1973-74मध्ये इराणी ट्रॉफीत बॉम्बे संघाविरुद्ध खेळताना उल्लेखनीय 170 धावांची खेळी केली होती. हा पराक्रम त्यांनी शेष भारतीय संघाकडून खेळताना नोंदवला होता. त्यांच्या या कामगिरीने त्यांची राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या संधीची दारे खुली झाली होती. या सामन्यात बॉम्बे संघाकडून खेळताना गुंडप्पा विश्वनाथ आणि ब्रिजेश पटेल यांनी मिळून अर्धशतक केल्याने हा सामना अनिर्णीत राहिला होता.

-यानंतर बऱ्याच वर्षांनी बोस यांनी एबीपीच्या गौतम भट्टाचार्य यांना सांगितले होते की, त्यांना दारूचे आणि पत्ते खेळण्याचे व्यसन होते.

-तसेच भट्टाचार्य यांना त्यांनी एक किस्साही सांगितला होता. तो असा की, इराणी ट्रॉफीचा सामना खेळल्यानंतर जेव्हा त्यांचा संघ ट्रेनने अहमदाबादवरून बॉम्बेला चालला होता. तेव्हा त्यांचा पतौडी (इफ्तिखार अली खान) यांच्याशी सिगारेटवरून वाद झाला होता. परंतु नंतर बोस यांना त्यांच्या वागणुकीचे खूप वाईट वाटले होते.

-एवढेच नव्हे तर बोस यांनी कोलम्बो ओव्हल स्टेडियवरील अनधिकृत कसोटी सामन्यात शतक करत सुनील गावकसकरांसोबत 194 धावांची भागीदारी केली होती. यावेळी त्यांनी एकूण 104 धावा केल्या होत्या.

-या अनधिकृत कसोटी सामन्यातील बोस यांच्या शतकी पराक्रमामुळे त्यांना इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, पदार्पणाच्या वनडे सामन्यात त्यांनी अवघ्या 13 धावा केल्या होत्या. असे असले तरी, यावेळी फलंदाजीत न चमकू शकलेले बोस यांनी 11 षटके गोलंदाजी करताना इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड एललॉयड्स (David Lloyd’s) यांची 39 धावांवर महत्त्वाची विकेट घेतली होती.

मात्र पुढे एकाही वनडेत त्यांना भारतीय संघात प्रवेश न मिळाल्याने इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांचा पहिला आणि शेवटचा वनडे सामना ठरला.

-2008 साली भारताला 19 वर्षांखालील विश्वचषकात विजेतेपद मिळवून देण्यात बोस यांचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्या संघाचा कर्णधार विराट कोहली होता.

-बोस यांचे वयाच्या 71व्या वर्षी किडनीच्या आजाराने लंडन येथे निधन झाले. ते त्यांच्या पत्नीसह युकेला गेले होते. तेथे त्यांना किडनीचा त्रास सुरु झाल्याने त्यांना 3 दिवस तेथील रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा त्रास खूप वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---