संपुर्ण नाव- गोपाळ शर्मा
जन्मतारिख- 3 ऑगस्ट, 1960
जन्मस्थळ- कानपुर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख -31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, 1985
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 25 ऑगस्ट, 1985
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 11, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 4/88
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 11, धावा- 11, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 11, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/29
थोडक्यात माहिती-
-गोपाळ शर्मा हे स्वातंत्र्यानंतर भारताकडून खेळणारे उत्तर प्रदेशचे पहिले क्रिकेटपटू होते. जर, संपूर्ण राज्याचे पाहायचे झाले तर भारताकडून खेळणारे ते उत्तर प्रदेश राज्यातील दुसरे क्रिकेटपटू होते. त्यांच्यापुर्वी 1936मध्ये महाराजकुमार यांनी भारताकडून क्रिकेट खेळले होते.
-शर्मा हे फलंदाजी करताना खूप सावधानतेने खेळत असत आणि त्यांच्यात खूप ताकदही होती. त्यांच्यातील या गुणांमुळे ते तास-न-तास तेवढ्याच क्षमतेने फलंदाजी करू शतक होते.
-शिवाय शर्मा हे त्या क्रिकेटपटूंपैकी एक होेते ज्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी पदार्पणाचा सामना खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांनी 1985मध्ये कानपुर येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते.
-या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 3 इंग्लंड क्रिकेपटूंच्या विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यानंतर 1990मध्ये त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत संधी मिळाली होती. मात्र, त्यांना या सामन्यात एकही विकेट घेता आली नव्हती. तो सामना त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
-शर्मा यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी मोठे विक्रम नोंदवता आले नसतील, तरी त्यांनी प्रथम श्रेणीत बरेच विक्रम केले होते. 104 प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी 2 शतकांसह 2 हजारापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर, 353 विकेट्स घेतल्या होत्या.
-2003-04मध्ये शर्मा हे भारतीय निवड समितीत मध्य विभागाचे प्रतिनिधी होते.
-झी न्यूजच्या एका वृत्तानुसार गोपाल यांच्यावरती काही खेळाडूंनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मात्र, नंतर काही पुरावे न मिळाल्याने त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आला. त्यानंतर गोपाल यांची उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.