संपुर्ण नाव- गुरकिरत रुपिंदर सिंग
जन्मतारिख- 29 जून, 1990
जन्मस्थळ- मुक्तसार, पंजाब
मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, गाजी ग्रुप क्रिकेटर्स, भारत अ, भारत ब, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, उत्तर विभाग, पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 17 जानेवारी, 2016, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 13, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-गुरकिरत सिंग याचे वडिल रुपिंदर सिंग मन हे मोहालीतील पंजाब मंडी बोर्डमध्ये काम करतात. त्याला सन्मन संधू ही मोठी बहीण आहे.
-गुरकिरतने वयाच्या 10व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
-पंजाबकडून गुरकिरतने 2011मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत टी20 सामना खेळला होता. हा सामना हरियाणाविरुद्ध झाला होता.
-डिसेंबर 2014मध्ये पंजाबकडून खेळताना त्याने प्रथम श्रेणीत नाबाद 73 धावा केल्या होत्या. यामुळे त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. प्रथम श्रेणीत त्याच्या सर्वाधिक धावा ह्या 201 इतक्या आहेत.
-गुरकिरत भारत अ संघाकडूनही खेळला आहे. 2015मध्ये त्याने तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध नाबाद 87 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. यात त्याच्या 9 चौकारांचा आणि 2 षटकारांचा समावेश होता.
-दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत गुरकिरतची निवड झाली होती. पण तिथे त्याला खेळायची संधी मिळाली नाही. शेवटी 2016मध्ये त्याने मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते.
-2015-16 या रणजी ट्रॉफी हंगामात गुरकिरतने रेल्वेजविरुद्ध द्विशतक ठोकले होते.
-2012पासून ते 2017पर्यंत तो किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता. 2018मध्ये त्याला दिल्ली डेअरडेविल्सने 75 लाखला विकत घेतले होते.
-2013मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना गुरकिरतने रॉस टेलरचा हंगामातील सर्वोत्कृष्ठ झेल पकडला होता.
-2019मध्ये तो त्याचा क्रिकेट आदर्श विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामाविष्ट झाला. आरसीबीने त्याला 50 लाखांना विकत घेतले होते.