संपुर्ण नाव- ज्ञानेंद्रकुमार केदारनाथ पांडे
जन्मतारिख- 12 ऑगस्ट, 1972
जन्मस्थळ- लखनऊ, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 24 मार्च, 1999, ठिकाण – जयपूर
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 4, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-डाव्या हाताचा फलंदाज ज्ञानेंद्र पांडे जर खेळपट्टीवर अधिक काळ टिकला, तर त्याला बाद करणे कठीण असायचे. शिवाय तो उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीही करत असल्याने, तो अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आला.
-18 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत पांडेने 5348 धावा केल्या होत्या. तर, एकूण 165 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
-90च्या दशकात तो उत्तर प्रदेश संघाचा कणा होता. 2005-06 या हंगामात त्याच्या 39 च्या सरासरीने केलेल्या 388 धावांमुळे उत्तर प्रदेशने रणजी ट्रॉफी इतिहासात पहिल्यांदा विजय मिळवला होता.
-देवधर ट्रॉफीच्या 4 सामन्यातील नाबाद 17, नाबाद 72, नाबाद 26 या धावांच्या आणि 10 विकेट्सच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवले होते. तो 4ही सामन्यात मध्य विभाग संघाचा कर्णधार होता.
-पांडेने 2 1998-99ला पेप्सी चषकात 2 वनडे सामने खेळले, तेही पाकिस्तानविरुद्ध. पहिल्या जयपूर येथील सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर, मोहालीतील दुसऱ्या आणि कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात तो 9 चेंडूत 4 धावांवर बाद झाला.
-पण, त्याच्या पदार्पणाच्या वनडेतील 10-1-39-0 या आकडेवारीमुळे तो पुढे संधी मिळण्यासाठी पात्र होता. मात्र असे झाले नाही
-पांडेने 2003 ते 2005च्या लँकशायरमधील लीगमध्ये टॉडमॉर्डनकडून क्रिकेट खेळले होते.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर पांडे बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीचा सदस्य बनला.