संपुर्ण नाव- हार्दिक हिमांशू पंड्या
जन्मतारिख- 11 ऑक्टोबर, 1993
जन्मस्थळ- चोर्यासी, गुजरात
मुख्य संघ- भारत, बडोदा, भारत अ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश आणि मुंबई इंडियन्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती-वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 26 ते 29 जुलै, 2017, ठिकाण – गॅले
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 16 ऑक्टोबर, 2016, ठिकाण – धरमशाला
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 26 जानेवारी, 2016, ठिकाण – ऍडलेड
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 11, धावा- 532, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 11, विकेट्स- 17, सर्वोत्तम कामगिरी- 5/28
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 54, धावा- 957, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 54, विकेट्स- 54, सर्वोत्तम कामगिरी- 3/31
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 310, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 38, सर्वोत्तम कामगिरी- 4/38
थोडक्यात माहिती-
-हार्दिक पंड्याचे वडील हिमांशू यांचा कार फायनॅन्सिंगचा व्यवसाय होता. त्यांना खेळाची खूप आवड होती. पण त्यांना 3 वेळा हृद्याचा झटका आल्याने त्यांनी नोकरी सोडली.
-हार्दिक 5 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय सोडला आणि ते सुरतवरून बडोदामध्ये स्थायी झाले. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आणि कृणालला किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. त्यावेळी हार्दिक 5 आणि कृणाल 7 वर्षांचा होता.
-गुजरातमधील गावाअंतर्गत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत हार्दिक आणि कृणालला एका सामन्याचे प्रत्येकी 400 आणि 500 रुपये मिळायचे.
-हार्दिकने भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. त्याने 18 कसोटी सामन्यात 121 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.
-हार्दिकने 9वीमध्ये असताना नापास झाला होता. म्हणून त्याने क्रिकेटसाठी त्याचे शिक्षण सोडले.
-हार्दिकला मुंबई इंडियन्समधील त्याच्या संघ सहकाऱ्यांनी रॉकस्टार हे टोपणनाव दिले आहे.
-हार्दिक हा सुरुवातील लेग स्पिन गोलंदाजी करत होता. एके दिवशी किरण मोरे अकामीत एक सामन्यात वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होती त्यामुळे मोरेंच्या म्हणण्यानुसार त्याने वेगवान गोलंदाजी केली आणि अशाप्रकारे पुढे तो मध्यमगती वेगवान गोलंदाज बनला.
-सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एका सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळताना मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षण जॉन राईट हे हार्दिकच्या खेळीने प्रभावित झाले होते. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉइंटिंग यांनी हार्दिकला आयपीएलच्या 8व्या हंगामासाठी 50 खेळांडूमध्ये निवडले होते. पुढे 2015मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 10 लाखांना विकत घेतले होते.
-आयपीएलमध्ये पदार्पण करताच त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 8 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. तर, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 31 चेंडूतील 61 धावांनी त्याला सामनावीर पुरस्कार मिळवून दिला होता.
-6 फूट 1 इंच उंची असणारा हार्दिकच्या अंगावर बरेच टॅट्यू आहेत.
-आयसीसी टी20 विश्वचषकात बांग्लादेशविरुद्ध हार्दिकने अविस्मरणीय गोलंदाजी केली होती. बांग्लादेशला शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज होती. यावेळी हार्दिकने गोलंदाजी करत 3 चेंडूत 2 झेल आणि 1 धावबाद अशी हॅटट्रीक घेतली होती.
-2020मध्ये हार्दिकचा सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅन्केविक हिच्याशी साखरपुडा झाला आहे. तिने द बॉडी, सत्याग्रह अशा हिंदी चित्रपटातही काम केले आहे.








