संपुर्ण नाव- हेमांग कमल बदाणी
जन्मतारिख- 14 नोव्हेंबर, 1976
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई सुपरस्टार्स, विदर्भ आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख -15 ते 18 जून, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांगलादेश, तारिख – 30 ते 31 मे, 2000
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 94, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 867, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 1/07
थोडक्यात माहिती-
-हेमांग बदाणी हे मधल्या फळीतील डाव्या हाताचे फलंदाज होते. क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवण्यापुर्वी बदाणी हे इंडियन सिमेंटचे कर्मचारी होते.
-1999-2000 साली हेमांग बदाणी यांच्यासोबत एक किस्सा घडला होता, जो त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध तमिळनाडूमध्ये रणजी ट्रॉफी उपांत्य सामना चालू होता. यादरम्यान मुंबईकडून फलंदाजी करणाऱ्या सचिन तेंडूलकरला तमिळ कळते हे जेव्हा त्यांना स्वत: सचिनने सांगितले हे ऐकूण दोघेही प्रचंड हसले होते.
– 2000-01 या वर्षात मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांना सट्टेबाजीच्या प्रकरणामुळे संघातून बाहेर काढल्याने बदाणी यांची भारतीय संघातील जागा निश्चित झाली होती.
-2001 साली झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच बदाणी यांनी 58 धावांची खेळी करत संघाच्या विजयात हातभार लावला होता.
-त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील मोठी खेळी त्यांनी पुणे येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केली होती. यावेळी त्यांनी 100 चेंडूत 98 धावा केल्या होत्या. ज्या त्यांच्या कसोटीतील सर्वोत्कृष्ट धावा होत्या.
-2001 साली बदाणी यांना कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पुढे 3 वेळा त्यांना ही संधी पुन्हा मिळाली होती. पण, ते एकाही वेळेला या संधीचा फायदा घेऊन चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
-त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवातच फटकेबाजीने झाली होती. त्यांनी सुरुवातीच्या 3 सामन्यात 122च्या सरासरीने 366 धावा केल्या होत्या.
-2002-03च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यातील त्यांच्या शतकी खेळीनंतर पुढे, इंग्लंड दौऱ्यावर ते भारत अ संघाचे उपकर्णधार बनले होते.
-शिवाय 2009-10 सालच्या विजय हजारे ट्रॉफीत बदाणी यांना राजस्थानकडून खेळण्याची संधी मिळाली होती.
-बदाणी यांनी आयसीएलमध्ये चेन्नई सुपरस्टार्सकडूनही क्रिकेट खेळले आहे.
-शिवाय आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघातही त्यांची निवड झाली होती. मात्र, त्यांना खेळायची संधी मिळाली नव्हती.
-ते आता तमिळनाडू प्रिमियर लीगच्या चेन्नई सुपर गिलीज संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत