संपुर्ण नाव- इरफान खान पठाण
जन्मतारिख- 27 ऑक्टोबर, 1984
जन्मस्थळ- बडोदा, गुजरात
मुख्य संघ- भारत, बडोदा, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, मिडलसेक्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 12 ते 16 डिसेंबर, 2003
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 9 जून, 2004
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 29, धावा- 1105, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 29, विकेट्स- 100, सर्वोत्तम कामगिरी- 7/59
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 120, धावा- 1544, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 120, विकेट्स- 173, सर्वोत्तम कामगिरी- 5/27
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 24, धावा- 172, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 24, विकेट्स- 28, सर्वोत्तम कामगिरी- 3/16
थोडक्यात माहिती-
-भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याने वयाच्या 19व्या वर्षी रिव्हर्स स्विंगिंग यॉर्करने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅडम गिलक्रिस्टची विकेट घेतली होती. त्याच्या या विकेटसाठी तो बराच काळ अविस्मरणीय राहिला.
-इरफानचा भाऊ युसूफ पठाण हादेखील भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने भारताकडून वनडे आणि टी20 क्रिकेट खेळले आहे.
-इरफानला क्रिकेटशिवाय डान्सचीही आवड होती. त्याने डान्स रियॅलिटी शो झलक दिखला जा रिलोडेडमध्ये वाइल्ड कार्ड इंट्रीवरती प्रवेश मिळवला होता. पुढे काळी दिवसांनी त्याच्या येत्या रणजी ट्रॉफी सामन्याची तयारी करण्याच्या अनुशंगाने त्याला शो सोडावा लागला.
-पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू वसिम अक्रम हे त्याचे क्रिकेटचे आदर्श आहेत.
-लहानपणी इरफानने भारताचे माजी कर्णधार दत्ता गायकवाड यांच्या हातून प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या 13व्या वाढदिवसाच्या 2 महिन्यांनंतर (डिसेंबर 1997) इरफानची 16 वर्षांखालील बडोदा क्रिकेट संघात निवड झाली होती.
-पुढे त्याने 2001 सालच्या रणजी ट्रॉफी विजयात महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याने त्याच्या पहिल्या रणजी ट्रॉफी हंगामात 43.28च्या सरासरीने 7 विकेट्स आणि 12.50च्या सरासरीने 75 धावा केल्या होत्या.
-भारतीय संघाचे निवडकर्ता किरण मोरे यांनी इरफानला चेन्नईतील एमआरएफ पेस फांउडेशनमध्ये दाखल केले होते. जेथे त्याच्या शैलीला अधिक सुधारण्याची त्याला संधी मिळाली.
-2002 साली इरफानची न्यूझीलंडमधील 19 वर्षांखालील विश्वचषकात निवड झाली होती.
-त्याने पुढे 1 वर्षांतच (2003) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना झहीर खानला दुखापत झाल्याने इरफानला एडलेड ओव्हल येथील दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली होती.
पुढे त्याला त्याच मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले होते. तर चौथ्या सामन्यात परत त्याला खेळण्याची संधी दिली गेली. ज्यात त्याने अॅडम गिलक्रिस्टची विकेट घेण्याचा कारनामा केला होता.
-इरफानने 2004 आणि 2006च्या पाकिस्तान कसोटी दौऱ्यावर उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. 29 जानेवारी 2006रोजी कराचीतील कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात इरफानने चौथ्या, 5व्या आणि 6व्या चेंडूवर सलग विकट घेतली होती. यामुळे तो कसोटीत हॅटट्रिक घेणारा दुसरा भारतीय ठरला होता.
-तर, 2007सालच्या टी20 विश्वचषकात इरफानने 14.9च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातील 3 विकेट्सने विश्वचषक भारताच्या खिशात घातले होते. ज्यामुळे त्याला सलामीवीरर पुरस्कारही मिळाला होता.
-वनडेत सर्वात जलद 1000च्या दुप्पट धावा आणि 100 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही इरफानच्या नावावर आहे. त्याने 1059 दिवसात हा विक्रम केला होता.
-वनडेत सर्वकालीन सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या याहीत इरफानचा 8व्या स्थानावर विराजमान आहे.
-शशि थरूर यांच्या भारताची अपयशी मुले (India’s lost boys) या यादीत विनोद कांबळी, लक्ष्मन शिवरामकृष्णन आणि इरफान यांचे नाव आहे. इरफानला त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत चमकदार कामगिरी करता आली नाही, म्हणून कदाचित त्याचे नाव या यादीत सामाविष्ट केले असावे.
-इरफान आणि भाऊ युसूफ हे त्यांच्या वडिलांना मशिदीमध्ये मदत करतात. पाकिस्तान दौऱ्यापुर्वी ते मशिदीत पाण्याच्या टाकी साफ करण्याचेही काम करायचे. विधवा स्त्रिया आणि अनाथ मुलांच्या मदतीसाठीही ते दान वाटप करत असतात.
-तर इरफानने त्याचे कानातलेही क्रिकेट फाउंडेशनच्या एका रिऍलिटी शोमध्ये दान केले आहे. 2007मध्ये दोघा भावांनी मिळून महमूद पठाण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली.
-इपफानने चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनराइजर्स हैद्राबाद आणि राईजिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीेएल खेळले आहे.
-शिवाय इरफानने 2005 साली मिडलसेक्स संघाकडून क्रिकेट खेळले आहे. खूप कमी भारतीय क्रिकेटपटूंना काउंन्टी क्रिकेट खेळण्याची संधी मिळते.
-युसुफ आणि इरफानने मिळून बडोदा येथे पठाण क्रिकेट अकॅडमीचीही स्थापना केली आहे. शिवाय त्यांनी ग्रेग चॅपेलशी करार केला आहे. ते अकॅमडमीचे मार्गदर्शक आहेत.
-इरफानने 2016ला साफा बैग हिच्याशी लग्न केले. शाफाचे लग्नापुर्वी सौदी अरेबिया मीडिया इंडस्ट्रीत मोठे नाव होते. गल्फ या फॅशन मासिकातची ती स्टार होती.