---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर जय प्रकाश यादव

---Advertisement---

संपुर्ण नाव- जय प्रकाश यादव

जन्मतारिख- 7 ऑगस्ट, 1974

जन्मस्थळ- भोपाल, मध्य प्रदेश

मुख्य संघ- भारत, दिल्ली जायन्ट्स, मध्य प्रदेश आणि रेल्वे

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 नोव्हेंबर, 2002

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 12, धावा- 81, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 2/32

थोडक्यात माहिती-

-मध्य प्रदेशच्या भोपालमधून भारतीय संघात खेळणारा जय प्रकाश यादव हा दुसराच क्रिकेटपटू आहे. त्याच्यापुर्वी भोपालच्या अजितेश अरगल याने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले होते.

-1998-99 साली यादवने मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. या संपूर्ण हंगामात त्याने 43च्या सरीसरीने 640 धावा केल्या होत्या. तर, 27च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या होत्या.

-तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2 हंगामात अष्टपैलू यादवने रेल्वे संघाकडून दमदार प्रदर्शन केले होते. 2001-02 या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 34च्या सरासरीने 408 धावा आणि 37च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 2004-05च्या हंगामात 42च्या सरासरीने 584 धावा आणि 20च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या होत्या.

-यापेक्षाही उत्कृष्ट खेळी त्याने इराणी ट्रॉफीत केली होती. 2001-02 साली रेल्वे संघाकडून सलामीला फलंदाजी करत यादवने 104 धावा केल्या. ज्यामुळे  रेल्वे संघाने तो सामना 50 धावांच्या आघाडीने जिंकला होता.

-प्रथम श्रेणीत यादवने 7334 धावा तर 296 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-त्याच्या कसोटीतील स्थानाबद्दलचे रहस्य अद्यपही उघडकीस आले नाही. कदाचित त्याची मध्यमगती गोलंदाजी निवडकर्त्यांना भावली नसेल. किंवा त्याच्या धावा पुरेशा नसतील.
-2002 साली वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत पदार्पण करणाऱ्या यादवला त्याच्या वनडे कारकिर्दीत चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे त्याने अवघ्या 3 वर्षांत वनडेतून निवृत्ती घेतली.
-त्याने दिल्ली जायंट्स संघाकडून आयसीएलमध्ये सामना खेळला होता. पण, पुढे बीसीसीआयने त्याला 2009मध्ये कर्जमाफी दिली.
-यादवला पोटाचा त्रास होता. वयाच्या 21व्या वर्षी त्याचा त्रास खूप वाढल्याने त्याला भोपालमधून मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले, तिथे त्याला ट्यूमर असल्याची बातमी कळली. त्यामुळे त्याला 7 किमोथेरपीच्या चाचण्या करण्याचा आणि 18 महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण चौथ्या चाचणीनंतरच त्याने मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---