संपुर्ण नाव- जय प्रकाश यादव
जन्मतारिख- 7 ऑगस्ट, 1974
जन्मस्थळ- भोपाल, मध्य प्रदेश
मुख्य संघ- भारत, दिल्ली जायन्ट्स, मध्य प्रदेश आणि रेल्वे
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 नोव्हेंबर, 2002
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 81, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 2/32
थोडक्यात माहिती-
-मध्य प्रदेशच्या भोपालमधून भारतीय संघात खेळणारा जय प्रकाश यादव हा दुसराच क्रिकेटपटू आहे. त्याच्यापुर्वी भोपालच्या अजितेश अरगल याने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले होते.
-1998-99 साली यादवने मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. या संपूर्ण हंगामात त्याने 43च्या सरीसरीने 640 धावा केल्या होत्या. तर, 27च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या होत्या.
-तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2 हंगामात अष्टपैलू यादवने रेल्वे संघाकडून दमदार प्रदर्शन केले होते. 2001-02 या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 34च्या सरासरीने 408 धावा आणि 37च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 2004-05च्या हंगामात 42च्या सरासरीने 584 धावा आणि 20च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या होत्या.
-यापेक्षाही उत्कृष्ट खेळी त्याने इराणी ट्रॉफीत केली होती. 2001-02 साली रेल्वे संघाकडून सलामीला फलंदाजी करत यादवने 104 धावा केल्या. ज्यामुळे रेल्वे संघाने तो सामना 50 धावांच्या आघाडीने जिंकला होता.