संपुर्ण नाव- जतिन वासुदेव परांजपे
जन्मतारिख- 17 एप्रिल, 1972
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 28 मे, 1998
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 54, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-जतिन परांजपेने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेची बहीण गांधली बेंद्रे हिच्याशी लग्न केले.
-त्याचे वडील वासुदेव परांजपे यांनी मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
-परांजपेने 1991-92साली रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्याला निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी 7 वर्षे लागली.
-1997-98च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने मुंबईकडून खेळताना 82.10च्या सरासरीने 821 धावा केल्या होत्या.
-त्याच्या या खेळीने त्याला पाकिस्तान अ विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती.
-1998 साली परांजपेने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्याच्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो लवकरच संघातून बाहेर पडला.
-मे 1998मध्ये केन्या आणि बांग्लादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेतून परांजपेने वनडेत पदार्पण केले होते.
-पुढे सप्टेंबर 1998ला टोरंटोतील सहारा चषकात पाकिस्तानविरुद्ध त्याने 23 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता.
-1999-2000ला रणजी ट्रॉफी हंगामात 50.15च्या सरासरीने 652 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 3 शतकांचा समावेश होता. तसेच त्याने सर्वोत्तम केलेल्या 185 धावांचाही समावेश होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर परांजपे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक म्हणून सहभागी झाला. तेथे त्याने सुनिल गावसकर आणि संजय मांजरेकरांप्रमाणे मार्गदर्शनही केले.
-परांजपे 2014पर्यंत नेदरलँडमधील युरोप फुटबॉल स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनीचा व्यवस्थापक होता.