---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर जोगिंदर शर्मा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 3, 2023 12:52 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- जोगिंदर नाथ शर्मा

जन्मतारिख- 23 ऑक्टोबर, 1983

जन्मस्थळ- रोहतक

मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, हरियाणा आणि इंडिया ब्ल्यू

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 23 डिसेंबर, 2004

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 19 सप्टेंबर, 2007

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 4, धावा- 35, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/28

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/20

थोडक्यात माहिती-

-जोगिंदर शर्मा हा खूप साध्या कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील तो लहान असताना पानचे दुकान चालवायचे.

-जोगिंदरने त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण मध्य प्रदेशविरुद्ध 2002-03च्या रणजी ट्रॉफीतून केले होते. यावेळी 84 धावात 11 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला होता. ज्यामुळे हरियाणाने तो सामना 103 धावांच्या जोरावर आपल्या खिशात घातला होता.

-त्याने त्याचा रणजी ट्रॉफी पदार्पणाचा हंगामात 17.41च्या सरासरीने 24 विकेट्स तर 46.66च्या सरासरीने 280 धावा केल्या होत्या. तर त्यापुढील 2003-04 या हंगामात 23.39च्या सरासरीने 23 विकेट्स आणि 68.51च्या सरासरीने 148 धावा आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.

-जोगिंदरची पश्चिम विभागाविरुद्धच्या दुलीप ट्रॉफीत निवड झाली होती. यावेळी उत्तर विभागाकडून खेळताना त्याने 59 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

-2004ला जोगिंदरने बंगलोरमध्ये वरिष्ट भारतीय संघाविरुद्ध 4 दिवसांचा सामना खेळला होता. यावेळी भारत अ कडून खेळताना त्याने राहूल द्रविड, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि युवराज सिंग अशा क्रिकेटपटूंना बाद करत आपल्या भारतीय संघातील आपल्या पदार्पणाची दारे खुली केली होती.

-2004-05च्या रणजी ट्रॉफी हंगामात विदर्भविरुद्ध जोगिंदरने 116 धावा देत 14 विकेट्स घेतल्या होत्या.तर, 2 शतकेही आपल्या खात्यात जमा केली होती. त्यानंतर त्यांची बांग्लादेश वनडे दौऱ्यावर निवड झाली होती.

-विशेष म्हणजे, जोगिंदर आणि एमएस धोनीने त्यांचे वनडे पदार्पण 23 डिसेंबर 2004 साली बांग्लादेशविरुद्ध केले होते.

-2007च्या टी20 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. यावेळी शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना जोगिंदरने पहिले 2 डॉट बॉल टाकले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूत त्याने माईक हसीला बाद केले. तर 5व्या चेंडूत ब्रेट लीची विकेट घेत चषकावर भारताचे नाव कोरले होते.

-तसेच तो 2007ला पाकिस्तानविरद्धच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम षटकासाठीही ओळखले जातात. त्याच्या कामगिरीमुळे त्याला हरियाणा सरकारने 21 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते.

-2007साली जोगिंदरच्या विश्वचषकातील प्रदर्शनाने त्याला हरियाणा सरकारने डीएसपीपदी नियुक्त केले.

-नोव्हेंबर 2011मध्ये जोगिंदरचा कार अपघात झाला होता. त्यावेळी त्याला डोक्याला गंभीर दुखापतही झाली होती. त्यानंतर तो  6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर बरा झाला.

-त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून 2 हंगाम खेळवल्यानंतर 2016मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

-भारत देश आता (2020) कोरोना व्हायरसच्या महामारीविरुद्ध लढत आहे. यात जोगिंदर त्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ दिवशी सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा भारतीय संघाचा हिरो बनलेला, जाणून घ्या एका क्लिकवर
बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटर जोगिंदर शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, ट्वीट करत दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---