संपुर्ण नाव- लालचंद सिताराम राजपूत
जन्मतारिख- 18 डिसेंबर, 1961
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, स्कॉटलँड, आसाम, मुंबई आणि विदर्भ
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख -30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 1985
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 23 जानेवारी, 1985
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 105, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 9, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-मुंबईतील सिताराम आणि प्रेमती राजपूत यांचा मुलगा म्हणजेच लालचंद राजपूत होय. राजपूत यांचे वडील सिताराम हे भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचे कर्मचारी होते. राजपूत हे चेंबूरमध्ये राहिले आहेत जिथे त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
-प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी राजपूत यांना घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी एका कॅम्पमध्ये राजपूत यांच्यातील कौशल्याला ओळखले आणि त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. आचरेकर यांनी सचिन तेंडूलकर यांनाही प्रशिक्षण केले आहे.
-1980-81मध्ये राजपूत हे 19 वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होते. यावेळी त्यांना श्रीलंका दौऱ्यावर रवी शास्त्री, नवजोत सिंग सिंधू, भरत अरूण आणि किरण मोरे यांच्यासह खेळण्याची संधी मिळाली होती.
-डिसेंबर 1981मध्ये पुण्यातील इंग्लंडविरुद्धच्या संघातून त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी 38 धावा केल्या होत्या. मात्र, गोलंदाजी करताना बॉब विलिस यांची महत्त्वाची विकेट घेतली होती.
-1985च्या पु्र्वकाळातील त्यांच्या देशांतर्गत हंगामातील कामगिरीने त्यांना वनडेत खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी नागपूर येथील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी सुनिल गावसकर यांच्यासोबत खेळताना शून्य धावा केल्या होत्या.
-1987 सालच्या दुलिप ट्रॉफीतील उपांत्य फेरित राजपूत यांनी मध्य विभागाविरुद्धच्या दुसऱ्या डावात 275 धावांची मोठी खेळी केली होती. यात त्यांच्या 23 चौकारांचा आणि 7 षटकारांचा समावेश होता.
-राजपूत यांचा रणजी ट्रॉफीतील बॉम्बेकडून खेळलेला शेवटचा सामना त्यांनी अवघ्या 2 धावांनी गमावला होता.1990-91मध्ये हा सामना झाला होता. त्यानंतर त्यांनी 1993पर्यंत आसामकडून पुढील रणजी ट्रॉफी सामने खेळले होते.
-राजपूत हे भारतातील प्रसिद्ध प्रशिक्षकांपैकी एक आहेत. 2007 सालच्या आयसीसी टी20 विश्वचषकात ते भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक होते. 2008पर्यंत ते संघाचे व्यवस्थापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने तिरंगी मालिकाही जिंकला आहे.
-राजपूत यांचा मुलगा अखिल राजपूत हादेखील क्रिकेटपटू आहे. त्याने 15 वर्षांखालील मुंबई संघाकडून क्रिकेट खेळले आहे.