संपुर्ण नाव- लक्ष्मी रतन शुक्ला
जन्मतारिख- 6 मे, 1981
जन्मस्थळ- हावडा (आता हाओडा), बंगाल
मुख्य संघ- भारत, बंगाल, दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 22 मार्च, 1999, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 18, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/25
थोडक्यात माहिती-
-लक्ष्मी रत शुक्ला यांनी आशियाई कसोटी चॅम्पियनशीपमधील श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 17व्या वयाच्या शुक्लाने 55 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-तर भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादशकडून खेळताना त्याने पाकिस्तानच्या एका फलंदाजाला तंबूत पाठवले होते. पण, पुढे आशिष नेहराच्या आगमनाने त्याला एकही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.
-त्याच्या काही महिन्यांनंतर म्हणजेच मार्च 1999 ला शुक्लाने वनडेत पदार्पण केले. यावेळी 2 वनडेत त्याला सुरुवातीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, या 2 सामन्यात त्याने 4.94च्या सरासरीने अवघी 1 विकेट घेतली होती.
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये शुक्लाने 2 दशके घालवली. यावेळी 36च्या सरासरीने तो 6217 धावा करू शकला. तर, 35च्या सरासरीने त्याने 172 विकेट्स घेतल्या.
-शुक्लाने 2010-11मध्ये आसामविरुद्ध 250 धावा करत वृद्धिमान साहा सोबत 417 धावांची भागीदारी रचली. हा बंगालकडून एक विक्रम ठरला.
-शुक्लाने 137 प्रथम श्रेणी सामने खेळले. यासह बंगालकडून 100 सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला.
-त्याने 2011-12च्या विजय हजारे ट्रॉफीच्या विजयातही हातभार लावला होता. यावेळी झारखंडविरुद्ध त्याने 96 चेंडूत नाबाद 151धावा केल्या. तर अंतिम सामन्यात 38 धावांवर 4 विकेट्स घेत आणि 90 चेंडूत 106 धावा करत बंगालला विजय मिळवून दिला.
-संपूर्ण स्पर्धेत त्याने 58च्या सरासरीने 291 धावा आणि 24च्या सरासरीने 11 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
-शुक्ला आयपीलच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 5 हंगामात भाग होता. तर, दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना त्याचा स्ट्राईक रेट 121 तर इकोनॉमी रेट 7.11 होता. त्याच्या आयपीएलमधील चांगल्या कामगिरीव्यतिरिक्तही त्याला आंतरराष्ट्रीय टी20त खेळण्याची संधी मिळाली नाही.
-2015मध्ये शुक्लाने निवृत्ती घेतली आणि तो ऑल इंडिया तृषमूल काँग्रेसकडून आमदार बनला.
-तसेच ममता बॅनर्जीं दुसऱ्यांदा निवडूण आल्यानंतर तो राज्य स्पोर्ट्स आणि युवा सर्विसचा मंत्री बनला.