संपुर्ण नाव- मनोज प्रभाकर
जन्मतारिख- 15 एप्रिल, 1963
जन्मस्थळ- गाझियाबाद, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि दर्हाम
फलंदाजी शैली – उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 12 ते 17 डिसेंबर, 1984, ठिकाण – दिल्ली
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 8 एप्रिल, 1984, ठिकाण – शारजाह
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 39, धावा- 1600, शतके- 1, सर्वोत्तम कामगिरी – 120 धावा
गोलंदाजी- सामने- 39, विकेट्स- 96, सर्वोत्तम कामगिरी- 6/132
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 130, धावा- 1858, शतके- 2, सर्वोत्तम कामगिरी – 106 धावा
गोलंदाजी- सामने- 130, विकेट्स- 157, सर्वोत्तम कामगिरी- 5/33
थोडक्यात माहिती-
-मनोज प्रभाकर हे भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मात्र, त्यांना त्यांच्या कामगिरीहून जास्त त्यांच्या चुकीच्या कामासाठी आठवले जाते.
-मे 2000मध्ये प्रभाकर यांनी कपिल देव यांच्यावर लाच दिल्याचा आरोप लावला होता. कपिल यांनी 25 लाख रुपये लाच दिल्याचा आरोप प्रभाकर यांनी त्यांच्यावर केला होता. पण, तहेलकाच्या टीमने स्टींग ऑपरेशनच्या मदतीने सत्य समोर आणले. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावरती प्रतिबंध घातले होते.
-याव्यतिरिक्त 1994मध्ये भारतीय संघाचा वेस्ट इंडिज विरुद्ध विलिस विश्वमालिकेत सामना झाला होता त्यावेळी भारताचे क्रिकेटपटू नयन मोनिंगा यांनी मुद्दाम 21 चेंडूत अवघ्या 4 धावा केल्या होत्या. त्यांच्याबरोबरच प्रभाकर यांनीही मुद्दाम हळूवार शतक केले होते. ज्यामुळे वेस्ट इंडिजने तो सामना 43 धावांनी जिंकला होता. त्यानंतर, दोघांनीही मॅच फिक्सिंग केल्याचे समोर आले होते.
-1997साली त्यांनी लग्न झालेले असतानाही अभिनेत्री फरहीन यांच्याशी दुसरे लग्न केले होते. फरहिन यांनी जान तेरे नाम या हिंदी आणि कलैगनेन या तमिळ सिनेमात काम केले आहे.
-ते आता त्यांच्या पत्नी फरहीन आणि मुले राहील, मनवंश आणि पहिली पत्नी संध्यापासून झालेला मुलगा रोहन यांच्यासह दिल्लीमध्ये राहतात.
-प्रभाकर यांनी क्रिकेट क्षेत्राव्यतिरिक्त राजकारणातही काम केले आहे.
-प्रभाकर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत 39 कसोटी सामन्यात 1600 धावा आणि 96 विकेट्स घेतल्या होत्या. यापैकी 21 सामन्यात त्यांनी सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी अशी कामगिरी केली होती.
-कसोटीत भारतीय संघात पुनरागमन करताना 1986-87मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धची 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत त्यांनी 168 धावा आणि 16 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे या काळात त्यांनी रिव्हर्स स्विंग गोलंदाजी शिकली होती.
-या वर्षातच (1986-87) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वनडे सामनाही झाला होता. या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना प्रभाकर यांनी इमरान खान, वासिम अक्रम आणि अब्दुल कादिर या पाकिस्तानी गोलंदाजाविरुद्ध 121 धावा केल्या होत्या.
-1995-96मधील श्रीलंकेविरुद्धचा विश्वचषक हा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. त्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
-निवृत्तीनंतर प्रभाकर हे दिल्ली संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तसेच डिसेंबर 2015मध्ये त्यांनी अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.