संपुर्ण नाव- मनप्रीत सिंग गोनी
जन्मतारिख- 4 जानेवारी, 1984
जन्मस्थळ- रूपनगर, पंजाब
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, पंजाब आणि टोरंटो नॅशनल्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध हाँगकाँग, तारिख – 25 जून, 2008, ठिकाण – कराची
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/65
थोडक्यात माहिती-
-भारताचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज मनप्रीत गोनीच्या शॉर्ट लेंथने चेंडू टाकण्याच्या शैलीने त्याला आयपीएलच्या पहिल्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली होती. या हंगामात तो सीएसकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
-2008मध्ये त्याला आशिया चषकातील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यावेळी 2.20च्या एकोनॉमी रेटने गोणीने गोलंदाजी केली. पण त्याला विकेट मिळवण्यात यश आले नाही.
-बांग्लादेशविरुद्धच्या आपल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची 8-0-65-2 अशी आकडेवारी होती. यावेळी त्याने मोहम्मद अश्रफउलला बाद केले होते. त्यानंतर त्याला पुढे एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.