संपुर्ण नाव- मार्गशयम वेंकटरमण
जन्मतारिख- 24 एप्रिल, 1966
जन्मस्थळ- सिकंदराबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -28 एप्रिल ते 3 मे, 1989
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 17 डिसेंबर, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/10
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/36
थोडक्यात माहिती-
-सिंकदराबाद येथे जन्मलेले मार्गशयम वेंकटरमण हे पुढे मदुराई येथे रहायला गेले. तेथे त्यांनी क्रिकेट आणि बास्केटबॉल दोन्हींचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, पुढे त्यांचा क्रिकेटकडील कल अधिक वाढला.
-वेंकटरमण यांनी वयाच्या 21व्या वर्षी केरळ विरुद्धच्या सामन्यातून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले. यावेळी त्यांनी 15 धावा देत 2 विकेट्स घेण्याच्या पराक्रम केला होता.
-त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाकडून सर्वाधिक सामने खेळले होते. प्रथम श्रेणीत त्यांनी 75 सामन्यात 247 विकेट्स घेतल्या होत्या.
-वेंकटरमण यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दारे 1988-89मध्ये खुली झाली. यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यातून त्यांनी आणि राशिद पटेल यांनी वनडेत पदार्पण केले होते. यावेळी 36 धावा देत 2 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यांनी केला. पण, दुर्दैवाने त्यांना पुढे एकही वनडे सामना खेळायची संधी मिळाली नव्हती.
-1988-89 सालची वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जी वेस्ट इंडिजचे फलंदाज व्हिव रिचर्ड्स यांच्यासाठी बदल्याची मालिका होती. कारण त्यापुर्वीच्या हिरवानी यांच्या नेतृत्वाखालील कसोटीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
-या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या वेंकटरमण यांनी 11 षटके गोलंदाजी करत अवघी एक विकेट घेतली होती. त्यांच्या या प्रदर्शनाने त्यांना पुढे कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.
-असे असले तरी, वेंकटरमण यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील आपली कामगिरी चालू ठेवली. 1992-93च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्यांनी 19.48च्या सरासरीने 35 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वेंकररमण हे तिसऱ्या दर्जाचे प्रशिक्षक बनले. त्यांनी सिंगापूर क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशिक्षण करत 2009 साली सिंगापूरला आयसीसी विश्व क्रिकेट लीगचे विजेतेपद मिळवून देण्याचे काम केले.
-2011मध्ये सिंगापूरमधील प्रशिक्षणाचे कार्य संपताच ते भारतात परतले. आता वेंकटरमण हे श्री रामचंद मेडिकल सायन्सच्या स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरमध्ये युवा गोलंदाजांना प्रशिक्षण देतात.