---Advertisement---

वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहम्मद कैफ

---Advertisement---

संपुर्ण नाव- मोहम्मद कैफ

जन्मतारिख- 1 डिसेंबर, 1980

जन्मस्थळ- अलाहाबाद, उत्तर प्रदेश

मुख्य संघ- भारत, डर्बिशायर, ग्लॉस्टरशायर, इंडिया रेड, किंग्स इलेव्हन पंजाब, लिसेस्टरशायर, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि उत्तर प्रदेश

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 2 ते 6 मार्च, 2000

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 28 जानेवारी, 2002

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 13, धावा- 624, शतके- 1

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 125, धावा- 2753, शतके- 2

थोडक्यात माहिती-

-मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) हा क्रिकेटर कुटुंबातला आहे. त्याचे वडील मोहम्मद तारिफ यांनी उत्तर प्रदेश आणि रेल्वे संघाकडून देशांतर्गत स्तरावरील क्रिकेट खेळले आहे. तर त्याचे मोठे भाऊ मोहम्मद सैफ यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळले आहे.

-कैफला त्याच्या आईच्या हातचा पुलाव आणि आंब्याचे लोणचे खूप आवडते.

-कैफ हे लखनऊ येथील प्रसिद्ध स्पोर्ट हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी होते. येथूनच सुरेश रैना, आरपी सिंग आणि ज्ञानेंद्र पांडे यांनीदेखील शिक्षम घेतले आहे.

-2000 साली कैफने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातील संघाचे नेतृत्त्व केले आहे. तो 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने 19 वर्षांखालील चषकावर आपले नाव कोरले होते.

-कानपूर येथील 2002 सालच्या इग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात कैफ यांना पदार्पण केले होते. मात्र, त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पुढील वनडे सामन्यात त्याने फलंदाजी करत 46 धावा केल्या खऱ्या पण भारताने तो सामना अवघ्या 2 धावांनी गमावला.

-2002च्या नेटवेस्ट सीरीजमध्ये दमदार खेळी करत कैफलने त्याचे भारतीय संघातील स्थान पक्के केले होते. यावेळी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 75 चेंडूत 86 धावा करत त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. यासाठी त्याला सलामीवीर पुरस्कारही मिळाला होता.

त्यानंतर सौरव गांगुलीने त्याला मिठी मारत त्याची प्रशंसा केली होती. तो त्याच्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरल्याचेही त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

-कैफ हा मोहम्मद अझिरुद्दीन यांचा चाहता होता. तर, त्याचा दुसरा क्रिकेट हिरो सचिन तेंडूलकर आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही कैफच्या कसोटी पदार्पणाच्यावेळी संघात होते.

-शिवाय त्याचा सर्वात महत्त्वाचा नेटवेस्ट सिरीजमधील सामना त्याच्या कुटुंबातील कुणीही पाहिला नव्हता. त्यावेळी घरातील सगळे थेटरमध्ये सिनेमा रपाहायला गेले होते.

-2005 साली कैफने नकोसे वर्तन केले होते. यावेळी इडन गार्डनमधील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार सौरव गांगुली यांनी कैफची पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून संघात निवड केली होती. तेव्हा पाकिस्तानचा फलंदाज युसिफ यौहान (आता मोहम्मद युसुफ) याने 87 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. त्याच्या स्लो रेट फलंदाजीला त्रासून कैफने त्याच्याविरुद्ध अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. ज्यामुळे त्याला पुढे एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही. भारताने तो सामना 195 धावांनी खिशात घातला होता.

-2008साली म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या मोसमात कैफ हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला राजस्थान रॉयल्सने 675000 युएसडीला विकत घेतले होते. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात अवघ्या 176 धावा केल्या होत्या.

-2009साली त्याला राजस्थान संघातून काढून टाकण्यात आले. पण, पुढे 2010ला त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने 250000 युएसडीला विकत घेतले होते. त्याने नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनकही आयपीएल खेळले.

-कैफ हा उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. त्याने 2003च्या विश्वचषकात इग्लंडच्या निक नाईट यांना धावबाद केले होते. यासाठीच नव्हे तर तो त्याने झेललेल्या झेलसाठी आणि स्टंपवरती फेकलेल्या चेंडूच्या थ्रोसाठीही प्रसिद्द आहे.

-25 मार्च 2011 रोजी कैफ यांनी सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्यांची मुलगी पुजा यादवशी लग्न केले. त्या दिल्लीतील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच पत्रकारही आहेत. त्यांना कबिर नावाचा मुलगादेखील आहे.

-2014 साली कैफने देशांतर्गत क्रिकेटमधील उत्तर प्रदेशचे कर्णधारपद सोडून आंध्र प्रदेशच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. पण अवघे एक हंगाम आंध्र प्रदेशकडून खेळत तो छत्तीसगडमध्ये सहभागी झाला.

-2014ला कैफने क्रिकेट व्यतिरिक्त राजकारणातही आपले नशीब आजमावले होते. पण, त्याला यात मात्र विजय मिळवता आला नव्हता.

-2015मध्ये कैफने एक पाऊल पुढे टाकत समालोचकाचे काम केले.  तो आरपी सिंग यांच्यासह हिंदी भाषेत उत्तम समालोचन करतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 10: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
FIFA World Cup: लिओनेल मेस्सीने रचला इतिहास! अर्जेंटिनाकडून पराभूत होऊनही पोलंड उपांत्यपूर्व फेरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---