संपुर्ण नाव- मोहम्मद सिराज
जन्मतारिख- 13 मार्च, 1994
जन्मस्थळ- हैद्राबाद
मुख्य संघ- भारत, हैद्राबाद, भारत अ, भारत ब, इंडिया ग्रीन, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, तारिख – 26 ते 29 डिसेंबर, 2020, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, तारिख – 25 जानेवारी, 2019, ठिकाण – ऍडलेड
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 4 नोव्हेंबर, 2017, ठिकाण – राजकोट
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द –
गोलंदाजी – सामने – 12, विकेट्स – 36, एका डावातील सर्वोत्तम कामगिरी – 5/73, सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी – 8/126
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द –
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/29
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 1/22
थोडक्यात माहिती-
-मोहम्मद सिराज ही हैद्राबदमधील मोहम्मद घौस या रिक्षाचालकाचा मुलगा आहे. तर, त्याची आई शबाना बेगम या आहेत. तर, सिराजचा मोठा भाऊ हा आयटी इंजिनिअर आहे.
-सिराज सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळत असायचा. त्याला सुरुवातीला कोणाचेही प्रशिक्षण लाभले नाही. तो स्वत:च गोलंदाजी शिकला.
-सिराजने सुरुवातीला चारमिनार क्रिकेट क्लबमध्ये फलंदाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. पण पुढे तो गोलंदाजीकडे वळला.
-तो त्याच्या कांकांच्या नेतृत्त्वाखाली क्लबमध्ये क्रिकेट खेळत असायचा. त्याने 25 षटकात 9 विकेट्स घेत त्याच्या काकांना प्रभावित केले होते आणि त्यांनी यावर त्याला 500 रुपये दिले होते.
-साल 2015-16मध्ये हैद्राबादकडून सिराजने प्रथम श्रेणी सामन्यात निवडण्यात आले होते. यावेळी सर्विसेस संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली नाही. पुढे विजय हजारे ट्रॉफीत 23 वर्षांखालील हैद्राबाद संघाकडून तो खेळला. तिथे त्याला प्रशिक्षण अरुण यादव यांनी पाहिले.
-सन 2016-17च्या रणजी ट्रॉफी हंगामात हैद्राबादकडून 18.92च्या सरासरीने 41 विकेट्स घेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला.
-त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळीने त्याला खूप मोठी संधी मिळवू दिली. 2016मध्ये सनराइजर्स हैद्राबादने त्याला 2.6 कोटींना विकत घेतले होते. या पैशातून त्याने आपल्या कुटुंबासाठी नवीन घर विकत घेतले.
-सिराज 2020-21 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रकाशझोतात आला. त्याने या दौऱ्यातील 3 कसोटी सामन्यात 13 विकेट्स घेतल्या.