संपुर्ण नाव- महेंद्र सिंग धोनी
जन्मतारिख- 7 जुलै, 1981
जन्मस्थळ- रांची, बिहार (आता झारखंड)
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया ब्ल्यू, आशिया एकादश, बिहार, ब्रॅडमन एकादश, चेन्नई सुपर किंग्स, पुर्व विभाग, 19 वर्षांखालील पुर्व विभाग, हेल्प फॉर हिरोज एकादश, भारत अ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, आंतरराष्ट्रीय एकादश, झारखंड, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, भारतीय शेष संघ, राइजिंग पुणे सिपरजायंट्स आणि सेहवाग एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 2 ते 6 डिसेंबर, 2005
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 23 डिसेंबर, 2004
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 90, धावा- 4876, शतके- 6
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 350, धावा- 10773, शतके- 10
गोलंदाजी- सामने- 350, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/14
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 98, धावा- 1617, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंग धोनी हा पान सिंग आणि देवकी देवी यांचा मुलगा आहे. त्याची बहीण जयंती गुप्ता ही इंग्रजी विषय शिक्षक आहे.
-धोनीचा भाऊ नरेंद्र सिंग हा राजकारणी आहे. त्याने 2009मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षनेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला. पुढे 2013मध्य त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
-धोनी (माही – टोपणनाव) लहान असताना फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळत असायचा. त्याने जिल्हा आणि क्लब स्तरावर दोन्ही खेळ खेळले आहेत.
-धोनी हा चांगला गोलकिपर असल्याने त्याच्या फुटबॉल पकडण्याच्या शैलीने प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांना प्रभावित केले. त्यांनी धोनीला क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करण्यासाठी प्रेरित केले.
-1994साली धोनीने पहिल्यांदा शालेय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी घेतली. पुढे 3 वर्षांच्या मेहनतीने त्याला फलंदाजी आणि यष्टीरक्षणात शालेय संघाचा हिरो बनवले. त्यावेळी त्याने पूर्ण दिवस फलंदाजी करत 150 चेंडूत 213 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 26 चौकारांचा आणि 2 षटकारांचा समावेश होता.
-धोनीने 1999-2000साली बिहार संघाकडून त्याचे रणजी ट्रॉफी पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 68 धावा करत, 5 सामन्यात 283 धावा केल्या होत्या.
-धोनीने 131 प्रथम श्रेणी सामन्यात 36.84च्या सरासरीने 7038 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 9 शतकांचा आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे.
-रांची येथील टेनिस बॉल स्पर्धेत धोनीच्या शॉटला हेलिकॉप्टर शॉट असे नाव देण्यात आले होते. हे नाव त्याचा मित्र संतोष लालने दिले होते.
-2001-03 याकाळात धोनी खडगपूर रेल्वे स्टेशन येथे प्रवास तिकीट परीक्षक होता.
-धोनीने 2004 साली बांग्लादेशविरुद्ध वनडे पदार्पण केले. यावेळी 7व्या क्रमांकावर फलंदाजी करत तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
-धोनीने 296 वनडे सामन्यात 10 शटकांसह आणि 64 अर्धशकांसह 9496 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो वनडेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला. पुढे त्याने 55 सामने खेळत 10हून अधिक धावा केल्या.
-धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने 3 आयसीसी ट्रॉफीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे- 2007 टी20 विश्वचषक, 2011 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी.
-धोनी हा भारतातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 27 कसोटीत भारताला आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवून दिला. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला 21 कसोटी जिंकून देणाऱ्या सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे.
-तर, धोनीने आपल्या नेतृत्वाखाली 110 वनडे आणि 41 टी20 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.
-यासह धोनी हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग आणि ऍलन बॉर्डरनंतर 100 पेक्षा जास्त वनडे सामन्यात संघाला आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवून देणारा तिसरा कर्णधार ठरला.
-धोनीने त्याच्या 5व्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 123 चेंडूत 148 धावा केल्या होत्या. हा सामना व्हिजाग येथे पाकिस्तानविरुद्ध झाला होता. यासह वनडेत सर्वात जलद शतक करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांचा मान त्याने मिळवला होता.
-त्याला सर्वोत्कृष्ट आणि जलद विकेट्स घेणारा यष्टीरक्षक समझले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात यष्टीमागे 155 फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा विकरम केला आहे.
-धोनीने कर्णधार असताना सर्वोत्कृष्ट 204 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तर, फलंदाज म्हणून त्याने एकूण 342 षटकार ठोकत सर्वाधिक षटकार ठोकण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत 5वा क्रमांक मिळवला आहे.
-तसेच त्याने कर्णधार म्हणून सर्वाधिक (331) आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
– धोनीने त्याच्या शानदार कारकिर्दीत नकोसा विक्रमही केला आहे. त्याने 2017च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. हे कोणत्या भारतीय फलंदाजाने केलेले दुसरे सर्वात हळूवार अर्धशतक आहे. त्यांचापुर्वी हा नकोसा विक्रम सदागोप्पन रमेश यांच्या नावावर आहे.
-धोनीने 4 जुलै 2010ला साक्षी सिंग रावत हिच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू उपस्थित होते. त्यांना 2015मध्ये मुलगी झाली, जिचे नाव जिवा आहे.
-धोनी हा एकमेव क्रिकेटपटू आहे, जो आयपीएलमध्ये 8 अंतिम सामन्यात खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना त्याने 2010, 2011 आणि 2018मध्ये विजय मिळवला आहे. 3वेळा संघाला आयपीएल जिंकवून देणारा तो एकमेव कर्णधार आहे.
-नोव्हेंबर 2011मध्ये त्याने भारतीय प्रांतातील लष्करमध्ये लेफनन्ट कर्नल होण्याचा मान मिळवला.
-डिसेंबर 2014मध्ये धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली.
-फेब्रुवारी 2018मध्ये धोनीने टी20त यष्टीमागे सर्वाधिक झेल पकडण्याचा विश्व विक्रम नोंदवला आहे.
-धोनीने आतापर्यंत 23 बाईक विकत घेतल्या आहेत. त्याच्याकडे यमाहा आरडी350, हारले डेविडसन फॅटबॉय, दुकाटी 1098, कावासाकी निनजा एच2 अशा खूप महागड्या बाईक आहेत.