संपुर्ण नाव- नमन विनयकुमार ओझा
जन्मतारिख- 20 जुलै, 1983
जन्मस्थळ- उज्जैन, मध्य प्रदेश
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, मध्य प्रदेश, राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2015, ठिकाण – कोलंबो
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 5 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 12 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 56, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 1, शतके- 0
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 12, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-नमन ओझा यांनी वयाच्या 14व्या वर्षी इंदोर येथे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांना मध्य प्रदेशचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू संजय जगदाळे यांच्या शिफारशीने इंदोर क्रिकेट क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
-जगदाळे ज्यांना बडे सर म्हणून ओळखले जाते, यांनी व्हीव्हीएस लक्ष्मण, मुरली कार्तिक, ऋषिकेश कानिटकर, श्रीधरन श्रीराम आणि विपिन आचार्य यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी ओझाही जगदाळेंच्या प्रशिक्षणाखाली शिकला आहे.
-ओझाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अ दर्जाचे क्रिकेट, वयोगटातील क्रिकेट, 19 वर्षांखालील आणि रणजी ट्रॉफी असे वयोगटातील क्रिकेट खेळले आहे.
-ओझा हा मर्यादीत षटकांच्या स्वरूपातील क्रिकेटसाठी ओळखला जातो. पण मुळात त्याला 4 दिवशीय सामने खेळायला खूप आवडतात.
-2009मध्ये ओझाला आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. यावेळी संपूर्ण हंगामात 8 सामने खेळले. पोर्ट एलिजाबेथ येथील डेक्कन चार्जर्स संघाविरुद्धच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात ओझा शून्यावर बाद झाला होता. त्यापुढील किंग्स इलेव्हन किंग्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील खराब कामगिरीने त्याची आयपीएलची दारे बंद केली होती.
पण कर्णधार शेन वॉर्न यांनी त्याला संधी दिली आणि प्रोत्साहनही दिले. याचा परिणाम असा झाला की त्याने पुढील सामन्यात 68 चेंडूत 51 धावा केल्या. राजस्थानने तो सामना 78 धावांनी जिंकला होता.
-आयपीएलच्या तिसऱ्या हंगामातही त्याने उत्कृष्ट खेळी केली. यावेळी प्रथमच 14 सामने खेळत त्याने 31.41च्या सरासरीने 377 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीने आणि शेन वॉटसनच्या अनुपस्थितीने त्याला खेळाण्याची संधी मिळाली.
-2012मधील न्यूझीलंड अ विरुद्धच्या सामन्यनंतर नरेंद्र हिरवानी यांनी ओझाला फलंदाजी प्रशिक्षक अमरे यांचा सल्ला घेण्यास सांगितले होते. त्याचा परिणाम असा झाला की, 2014मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत अ कडून खेळताना 4 दिवसांच्या सामन्यात ओझाने 3 सलग शतकांसोबत 430 धावा केल्या.
-वृद्धिमान साहाला इंग्लंड दौऱ्यावर असताना दुखापत झाल्याने श्रीलंकाविरुद्ध 2015मध्ये ओझाने कसोटी पदार्पण केले होते. यावेळी 2 डावात त्याने अनुक्रमे 30 आणि 20 धावा केल्या होत्या.
-राजस्थानकडून 7 हंगाम खेळल्यानंतर 9व्या आयपीएल हंगामात ओझाने सनराइजर्स हैद्राबादकडून खेळत आपल्या पुर्वीच्या राजस्थान संघाला पराभूत केले होते.
-2016मध्ये ओझाला भारत अ चा कर्णधार बनला होता. त्याने ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध नेतृत्तवपद सांभाळले.