संपुर्ण नाव- नरेंद्र दिपचंद हिरवानी
जन्मतारिख- 11 ऑक्टोबर, 1986
जन्मस्थळ- गोरखपूर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, बंगाल आणि मध्य प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (लेगब्रेक गुगली)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -11 ते 15 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 22 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 17, धावा- 54, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 17, विकेट्स- 66, सर्वोत्तम कामगिरी- 8/61
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 18, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 18, विकेट्स- 23, सर्वोत्तम कामगिरी- 4/43
थोडक्यात माहिती-
-नरेंद्र हिरवानी हे गोरखपूर येथील एका श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांची विटांची फॅक्टरी आहे. त्यांच्या घरातील व्यवसाय करण्याऐवजी हिरवानी यांनी क्रिकेटपटू होण्याचे ठरवले.
-त्या अनुशंगाने ते पुढे मध्य प्रदेशमधील इंदोर या शहरात गेले. तेथेच क्रिकेट मैदानापासून काही अंतरावर एका ठिकाणी ते भाड्याने राहू लागले.
-माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जगदाळे यांना हिरवानी आपले गुरु मानत असत. हिरवानी यांच्यासह व्हीव्हीएस लक्ष्मण, मुरली कार्तिक, अमय खुरेसिया आणि नमन ओझा यांना जगदाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
-डिसेंबर 1984साली हिरवानी यांनी मध्य प्रदेश संघाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच डावात 5 विकेट्स घेण्याचा त्यांनी पराक्रम केला होता.
-हिरवानी यांनी 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 कसोटी मालिका खेळल्या. यावेळी त्यांनी एकूण 23 विकेट्स घेतल्या होत्या.
-1987-88ला 23 वर्षांखालील वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामुळे हिरवानी यांचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या 6 विकेट्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची भारतीय संघात निवड झाली.
-1988 साली चेन्नई येथील वेस्ट इंडिज विरुद्धच्या साम्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हिरवानी यांनी येताच नवा इतिहास रचला होता. ते पदार्पणाच्या सामन्यातच 61 धावा देत 8 विकेट्स घेणारे जगातील चौथे गोलंदाज ठरले होते. तसेच ते कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजही ठरले होते.
-वनडेत त्यांची कामगिरी शारजा येथील वनडेत झळकून आली. यावेळी त्यांनी संपूर्ण मालिकेत 14 विकेट्स घेत मालिकावीर पुरस्कारही मिळवला होता.
-वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील 14 कसोटी सामने खेळल्यानंतर हिरवानी यांना 5 वर्षे कसोटीतून ब्रेक घ्यावा लागला.
-पुढे ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू गोलंदाज रिची बेनॉड यांच्या सल्ल्यानुसार हिरवानी यांना परत कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यात अवघ्या 2 विकेट्स घेत त्यांच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट झाला.
-1990 सालच्या ओव्हल स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत हिरवानी यांनी अनोखा विक्रम केला होता. यावेळी त्यांनी सलग 59 षटके (मध्यांतर सोडून) गोलंदाजी केली होती. जो एक विश्वविक्रम बनला होता.
-2001 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत हिरवानी यांची संघात निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना 11 जणांमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यांच्या जागी हरभजन सिंग यांना गोलंदाजीसाठी संधी देण्यात आली होती. ज्यात त्यांनी 32 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हिरवानी हे राष्ट्रीय निवडकर्ता बनले. यावेळी त्यांनी 2008-2012 याकाळात मध्य विभागाचे प्रतिनिधित्त्व केले.
-त्यांनी बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.
-वडिल हिरवानी यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा मिहीर हा सुद्धा उभरता क्रिकेटपटू आहे. त्याने मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.