संपुर्ण नाव- निलेश मोरेश्वर कुलकर्णी
जन्मतारिख- 3 एप्रिल, 1973
जन्मस्थळ- डोंबिवली, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, मुंबई आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 2 ते 6 ऑगस्ट, 1997
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 26 जुलै, 1997
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 5, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/70
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 11, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 11, सर्वोत्तम कामगिरी- 3/27
थोडक्यात माहिती-
-डाव्या हाताचा फिरकीपटू निलेश कुलकर्णी हा 1990 आणि 2000 या हंगामात मुंबई संघाचा उभरता क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात होता.
-कुलकर्णीने भारताकडून 3 कसोटी आणि 10 वनडे सामने खेळले आहेत.
-1997साली श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या चेंडूत मार्वन अट्टपटू यांची विकेट घेतली होती. कोलंबोत पहिल्या कसोटीत पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला. पण पुढे 70 षटके गोलंदाजी करूनही तो एकही विकेट घेऊ शकला नाही.
-वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याने 1997च्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केली होती. यावेळी 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. पण हा सामना भारताला 5 विकेट्सने गमवावा लागला.
-मुंबईकडून त्याने 10 वर्षांपेक्षा जास्त क्रिकेट खेळले आणि 2010 साली देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. संपूर्ण प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 24.89च्या सरासरीने 357 विकेट्स घेतल्या होत्या.
-ते आता एक यशस्वी उद्योजक आहेत.