संपुर्ण नाव- पंकज सिंग
जन्मतारिख- 6 मे, 1985
जन्मस्थळ- सुल्तानपूर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, इंडिया ग्रीन, पुदुच्चेरी, राजस्थान, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती-वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 27 ते 31 जुलै, 2014, ठिकाण – साउथम्टन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 5 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 10, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/113
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 3, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-पंकज सिंगने महाविद्यावयीन क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला औध विद्यापिठाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे त्याने आर्मीत जाण्याचे ठरवले होते. पण त्याला पुढे जयपूर क्रिकेट संघात संधी मिळाली.
-19 वर्षांखालील क्रिकेटमधील पंकजच्या कामगिरीने त्याला भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तसेच त्याने 2003-04मध्ये राजस्थान संघाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले.
-पंकजने 2006च्या रणजी ट्रॉफी हंगामात राजस्थानला प्लेट लीगच्या अंतिम सामन्यात पोहोचवले. त्याने संपूर्ण हंगामात 20.95च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या होत्या.
-2007मधील झिम्बाब्वे आणि केन्या दौऱ्यात पंकज भारत अ संघाचा भाग होता. यावेळी त्याने केन्याविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत आणि वनडेत मिळून 18 विकेट्स घेतल्या होत्या.
-एस श्रीसंत आणि मुनाफ पटेल यांना दुखापत झाल्याने 2007-08च्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पंकजची निवड झाली होती. पण त्याला खेळायला मात्र मिळाले नाही.
-पंकज हा 2010मधील झिम्बाब्वेतील तिरंगी मालिकेत संधी देण्यात आली होती. यावेळी त्याने श्रीलंकाविरुद्ध वनडेत 7 षटकात 45 धावा देल्या. पण त्याने एकही विकेट घेतली नाही. तो त्याचा एकमेव वनडे सामना होता.
-अखेर 2014मध्ये इंग्लंडविरुद्ध एमएल धोनीने पंकजला कसोटीत खेळण्यास संधी दिली. पंकज हा भारताकडून कसोटी खेळणारा 282वा खेळाडू होता. तो पार्थसार्थी शर्मानंतर 1977 पासून कसोटीत खेळणारा राजस्थानातील पहिला क्रिकेटपटू होता.
-इशांत शर्माला ददुखापत झाल्याने 2014तील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पंकजने पदार्पण केले होते. यावेळी त्याने 179 धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. अखेर इंग्लंडविरुद्धच्या पुढील कसोटी सामन्यात पंकजने 2 विकेट्स मिळवल्या.
-2008मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा तो भाग होता. तर, पुढील हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलेरमध्य सामाविष्ठ झाला. तिथून पुढे मात्र तो आयपीएलमध्ये खेळला नाही.
-10 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत पंकजने 117 सामने खेळत 472 विकेट्स घेतल्या होत्या.