संपुर्ण नाव- परवेज गुलाम रसूल झरगर
जन्मतारिख- 13 फेब्रुवारी, 1989
जन्मस्थळ- बिजबेहरा, जम्मू आणि काश्मिर
मुख्य संघ- भारत, भारत अ, जम्मू आणि काश्मिर, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनराईजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 15 जून, 2014, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 26 जानेवारी, 2017, ठिकाण – कानपूर
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/60
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 5, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/32
थोडक्यात माहिती-
-परवेज रसूलचे वडील गुलाम आणि भाऊ आसिफ यांनी राज्यस्तरीय क्रिकेट खेळले आहे. त्याच्या वडिलांनी अनंतनगकडून फलंदाजी केली होती. तर भावाने 2009मध्ये जम्मू आणि काश्मिरकडून राज्य टी20 सामने खेळले होते.
-जम्मू काश्मिरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या अब्दुल कयूम यांनी रसूलला सुरुवातीला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले.
-2008-09च्या प्रथम श्रेणी हंगामातून रसूलने जम्मू काश्मिरमध्ये पदार्पण केले होते. यावेळी दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या विराट कोहलीची त्याने विकेट घेतली होती.
-2009च्या ट्वेन्टी20 चॅम्पियन्स लीगवेळी बॅगमध्ये अवैध सामान असल्याच्या आरोपात बेंगलोर पोलिसांनी अटक केले होते. मात्र तपासणीनंतर बॅगमध्ये कुरान आणि चटई असल्याचे आढळून आल्याने त्याला सोडण्यात आले.
-2013-14मध्ये रसूल जम्मू काश्मिर संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या प्रयत्नाने 10 वर्षांनंतर त्याचा संघ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरिपर्यंत पोहोचला होता.
-रसूल हा आपीएलमध्ये खेळणारा जम्मू काश्मीरमधील पहिला क्रिकेटपटू आहे.
-2013मधील झिम्बाब्वे दौऱ्यावर रसूलची भारतीय संघात निवड झाली होती. यासह विवेक राजदाननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो जम्मू काश्मिरमधील दुसरा क्रिकेटपटू ठरला. पण त्याला यावेळी खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-अखेर 2014ला बांग्लादेशविरुद्ध वनडेत त्याने पादर्पण केले. या सामन्यात त्याने 60 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.