संपुर्ण नाव- पोचिया कृष्णमूर्ती
जन्मतारिख- 12 जुलै, 1947
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मृत्यू- 28 जानेवारी, 1999
मुख्य संघ- भारत आणि हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे फिरकीपटू गोलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 18 ते 23 फेब्रुवारी, 1971
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 22 फेब्रुवारी, 1976
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 33, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 6, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-पोचिया कृष्णमूर्ती यांना पालेमनी कृष्णमूर्ती म्हणूनही ओळखले जात होते. ते उंच असल्यामुळे वेगवान गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करू शकत होते. शिवाय त्यांनी काही सामन्यात यष्टीरक्षणही केले होते.
-त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध फेब्रुवारी ते एप्रिल 1971 या काळादरम्यान 5 कसोटी सामने खेळले होते. भारतीय संघाचे फलंदाज नियमीत यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांचा बदली खेळाडू म्हणून त्यांना भारतीय संघात खेळण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती.
– तसेच त्यांना इंग्लंडच्या दौऱ्यात आणि 4 वर्षांनंतर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघाकडून राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात होते. पण त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
– विषेश म्हणजे 1970साली वर्षभरात कृष्णमूर्ती यांनी हैद्राबाद संघाकडून सलामीला आणि 11व्या क्रमांकावर खेळताना शतकी खेळी केल्या होत्या.
-त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 108 सामन्यात यष्टीरक्षण करताना यष्टीमागे 218 विकेट्स घेतल्या होत्या. यात 68वेळा त्यांनी फलंदाजाला यष्टिचीत केले होते. तर, 150वेळा फलंदाजाला झेलबाद केले होते.
-वयाच्या 51व्या वर्षी त्यांचे निधन झाले.