---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर रणधीर सिंग

On: मंगळवार, मार्च 24, 2020 4:10 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- रणधीर बलिंद्र सिंग

जन्मतारिख- 16 ऑगस्ट, 1957

जन्मस्थळ- दिल्ली

मुख्य संघ- भारत आणि ओडिसा

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 25 नोव्हेंबर, 1981, ठिकाण – अहमदाबाद

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/30

थोडक्यात माहिती-

-पटियालातील राजघराण्यात जन्माला येणारे रणधीर सिंग यांचे कुंटुंब क्रिकेट क्षेत्रातही प्रसिद्ध होते. त्यांचे आजोबा भूपिंदर सिंग हे भारताचे माजी कर्णधार होते. त्यांनी 1911च्या इंग्लंड दौऱ्यावेळी भारताचे कर्णधारपद सांभाळले होते. तसेच 1915 ते 1937मध्ये त्यांनी 27 प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

-रणधीर यांचे वडील बलिंद्र सिंग यांनी 1939मध्ये केंब्रिज विद्यापिठाकडून नॉर्थम्पटनशायरविरुद्द प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यांचे काका यदविंद्र सिंग यांना पटियालाचा युवराज म्हणून ओळखले जाते. त्यांनी 1934मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता.

-1963मध्ये त्यांच्या जीवनात महत्त्वाचा बदल झाला. कुंटुंबातूनच त्यांना बंदूक चालवण्याची अर्थात शूटिंगची प्रेरणा मिळाली होती. त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील गन शूटिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

-1964च्या टोकियोतील ऑलम्पिकमध्ये ते भारतीय संघाच्या राखीव खेळाडू होते. यावेळी ते मिल्खा सिंग आणि गुरबच्चन सिंग रनधांवा यांच्यासोबत रूममध्ये राहिले होते.

-ते भारताकडून 5वेळा ऑलम्पिकमध्ये खेळले आहेत. मात्र, त्यांना मेडल जिंकण्यात अपयश आले. तरीही त्यांनी 1978मध्ये बॅंकॉक येथे आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आणि ते भारताला शूटिंग क्षेत्रात सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले भारतीय ठरले.

-1982च्या आशियाई स्पर्धेत रणधीर यांनी रौप्यपदक आणि कांस्यपदक जिंकले होते.

-1983 ते 1994दरम्यान रणधीर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटर आणि प्रशासकही होते. 1983मध्ये ते दिल्ली ऍथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष बनले. तसेच त्यांची भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या सहसचिवपदीही निवड झाली होती. त्याच्या 3 वर्षांनंतर त्यांची सरचिटणीसपदी निवड झाली आणि 2014पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.

-रणधीर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन वयात त्यांच्या संघाचे नेतृत्व केले होते.

-दिल्लीमध्ये जन्माला आलेल्या रणधीर यांनी 22 वर्षांखालील क्रिकेटमध्ये 28 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.  प्रथम श्रेणीतील 37च्या सरासरीने घेतलेल्या 146 विकेट्स घेतल्या होत्या.

-1981-82मध्ये अहमदाबाद येथील इंग्लंडविरुद्धचा वनडे सामना जो एक ऐतिहासिक सामना ठरला होता, तो रणधीर यांचा वनडे पदार्पणाचा सामना होता. पण या सामन्यात गोलंदाजी करताना रणधीर यांना विशेष कामगिरी करता आली नव्हती.

-यानंतर 2 वर्षांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत त्यांनी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. ही विकेट वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रिनिज यांची होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---