संपुर्ण नाव- रिषभ राजेंद्र पंत
जन्मतारिख- 4 ऑक्टोबर, 1997
जन्मस्थळ- हरिद्वार, उत्तराखंड
मुख्य संघ- भारत, दिल्ली, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डअरडेविल्स, 19 वर्षांखालील दिल्ली संघ, भारत अ, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यभयी एकादश आणि उत्तर विभाग
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 18 ते 22 ऑगस्ट, 2018, ठिकाण – नॉटिंघम
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 21 ऑक्टोबर, 2018, ठिकाण – गुवाहाटी
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 1 फेब्रुवारी, 2017, ठिकाण – बेंगलोर
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 31, धावा- 2123, शतके- 5
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 840, शतके- 1
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 61, धावा- 934, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-राजेंद्र पंत आणि सरोज पंत यांचा मुलगा रिषभ पंत याने चांगल्या प्रशिक्षकाच्या शोधात बराच प्रवास केला आहे. रूरकी या उत्तराखंडमधील शहरातून तो राजस्थानमध्ये गेला आणि शेवटी तो दिल्लीमध्ये स्थायिक झाला.
-वयाच्या 12व्या वर्षी पंत दिल्लीमध्ये तारक सिन्हा यांच्याकडून प्रशिक्षण घेत होता. त्यावेळी शहरात राहण्यासाठी जागा नसल्याने तो आणि त्याची आई दिल्लीतील मोती बाग येथील गुरुद्वारामध्ये राहत होते. पुढे सिन्हांच्या सल्ल्यानुसार तो राजस्थान संघाकडून खेळू लागला.
-पंतने राजस्थानकडून 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील क्रिकेट खेळले आहे.
-आपल्या 18व्या वाढदिवसाच्या एक महिना अगोदर त्याने दिल्लीकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले. 2015मध्ये बंगालविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण करत त्याने 57 धावांची खेळी केली होती.
-2016मध्ये महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात पंतने 326 चेंडूत 308 धावा केल्या होत्या. यासह वसिम जाफर आणि अभिनव मुंकुंदनंतर रणजी ट्रॉफीत त्रिशतक करणारा तो तिसरा युवा खेळाडू ठरला.
-तसेच रणजी ट्रॉफीत त्रिशतक करणारा तो दुसरा यष्टीरक्षक फंलदाज आणि प्रथम श्रेणीत सातवा फलंदाज ठरला. शिवाय दिल्लीकडून डिसेंबर 1994मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध रमन लांबाने 312 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर पंतने पहिल्यांदा दिल्लीकडून त्रिशतक केले होते.
-2016 सालच्या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक संघात त्याने जलद अर्धशतक ठोकले होते. भारतीय संघ या विश्वचषकात उपविजेता ठरला होता. त्याने नेपाळविरुद्ध 18 चेंडूत पहिले अर्धशतक केले होते. तर पुढील नाम्बियाविरुद्ध 96 चेंडूत 111 धावा करत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले होते.
-विश्वचषकातील पंतच्या प्रदर्शनाने दिल्ली डेअरडेविल्सने त्याला आयपीएल 2016मध्ये 1.9 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने 10 सामन्यात 198 धावा केल्या होत्या.
-पंत हा ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलक्रिस्ट यांचा चाहता आहे. दोघांचीही शैली थोडीफार सारखी आहे.
-2016-17मध्ये रणजी ट्रॉफी हंगामात झारखंडविरुद्ध पंतने सर्वात जलद शतक केले होते. 48 चेंडूत त्याने शतक ठोकले होते. त्याच सामन्यात त्याने 21 षटकारही ठोकले होते. यासह प्रथम श्रेणीत एका सामन्यात इतके षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
-सप्टेंबर 2018मध्ये पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटीत 159 धावा केल्या होत्या. यासह कसोटीत शतक ठोकणारा तो जगातील युवा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आणि इंग्लंडविरुद्ध शतक करणारा पहिला भारतीय युवा यष्टीरक्षक फलंदाज ठरला.
-तसेच सप्टेंबर 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पंतने यष्टीमागे 50 विकेट्स घेतल्या. यासह कसोटीत यष्टीमागे सर्वात जलद विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय य़ष्टीरक्षक ठरला.
महत्वाच्या बातम्या –
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
बिग ब्रेकिंगः टीम इंडियाचा संकट वाढलं, भारताचा मोठा खेळाडू वर्ल्डकपबाहेर