संपुर्ण नाव- रॉजर मायकल हम्पेरी बिन्नी
जन्मतारिख- 19 जुलै, 1955
जन्मस्थळ- बंगळुरु, कर्नाटक
मुख्य संघ- भारत, गोवा आणि कर्नाटक
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 21 ते 26 नोव्हेंबर, 1979 ठिकाण – बंगळुरु
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 डिसेंबर, 1980, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 830, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 47, सर्वोत्तम कामगिरी- 6/56
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 72, धावा- 629, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 72, विकेट्स- 77, सर्वोत्तम कामगिरी- 4/29
थोडक्यात माहिती-
-युवा वयात रॉजर बिन्नी यांनी अनेक खेळ खेळले होते. ते शाळेतून फुटबॉल आणि हॉकी खेळले होते. तर, भाला फेकमध्ये त्यांनी राष्ट्रीय विक्रमही नोंदवला होता.
-20वर्षाच्या वयात बिन्नी यांनी केरळविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणीत पदार्पण केले.
-त्यानंतरच्या हंगामात त्यांनी रणजी ट्रॉफीत कमाल केली. महाराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सलामीला फलंदाजी करत त्यांनी 71 धावा केल्या. पुढील हंगामात म्हणजेच 1977-78मध्ये त्यांनी 62.55च्या सरासरीने 563 धावा केल्या होत्या.
– भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन खेळाडू बनण्याचा मान रॉजर यांना मिळाला आहे.
-1983च्या विश्वचषकात भारतीय संघात मोठमोठ्या अष्टपैलू क्रिकेटपटूंचा समावेश होतो. कपिल देव यांनी संघाचे नेतृत्त्व केले होते. तर बिन्नी, मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ या अष्टपैलूंचा संघात समावेश होता. जरी या विश्वचषकात त्यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांनी गोलंदाजी करताना 18.67च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या होत्या.
-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी 29धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला उपांत्य फेरित पोहोचण्यास मदत झाली. शिवाय अंतिम समन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड यांची महत्त्वाची विकेट घेतली होती.
-ते देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार अष्टपैलू क्रिकेटपटू होते. रणजी ट्रॉफीत त्यांनी कर्नाटक संघाकडून सलामीला फलंदाजी केली होती तर कठीण काळात गोलंदाजीही केली होती. शिवाय ते क्षेत्ररक्षणातही माहीर होते.
-27 कसोटी सामन्यात त्यांनी 32.63च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर 23.05च्या सरासरीने 830 धावा केल्या होत्या. 72 वनडेत त्यांनी 29.35च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 16.12च्या सरासरीने 629 धावाकेल्या होत्या.
-2000 साली 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारताच्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी त्या भारतीय संघात मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांचा समावेश होता. तसेच पुढे त्यांनी रणजी ट्रॉफीत बंगाल संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आणि नंतर ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचेही भाग होते.
-2012मध्ये बिन्नी हे निवड समीतीतही होते.
-तसेच ते निवड समीतीत असतानाच त्यांचा मुलगा स्टुअर्ट याचीही या भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी स्टुअर्टला प्राधान्य दिले असल्याची टीका झाली होती. मात्र रॉजर बिन्नी यांनी सांगितले की ज्यावेळी त्यांच्या मुलाच्या निवडीचा प्रश्न उपस्थित व्हायचा तेव्हा ते रुममधून निघून जायचे आणि अन्य निवडकर्त्यांना निर्णय घेऊ द्यायचे.
-स्टुअर्टने 14 वनडेत 28.75च्या सरासरीने 230 धावा तर 21.95च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 2014मध्ये त्याने भारताकडू सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम केला होता. त्याने बांगलादेशविरुद्धच्या वनडेत 4 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.








