संपुर्ण नाव- रोहित गुरुनाथ शर्मा
जन्मतारिख- 30 एप्रिल, 1987
जन्मस्थळ- बनसोड, नागपूर, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, डेक्कन चार्जर्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भरतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एकादश, मुंबई, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश, मुंबई इंडियन्स, 19 वर्षांखालील मुंबई संघ, भारतीय शेष संघ आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 8 नोव्हेंबर, 2013, ठिकाण – कोलकाता
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध आर्यलँड, तारिख – 23 जून, 2007, ठिकाण – बेलफास्ट
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 19 सप्टेंबर, 2007, ठिकाण – दुर्बन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 32, धावा- 2141, शतके- 6
गोलंदाजी- सामने- 32, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/26
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 224, धावा- 9115, शतके- 29
गोलंदाजी- सामने- 224, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 2/27
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 108, धावा- 2773, शतके- 4
गोलंदाजी- सामने- 108, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/22
थोडक्यात माहिती-
-रोहित शर्मा कुमारवयात असताना त्याचे वडील गुरुनाथ शर्मा यांची वाहतूक कंपनीतील नोकरी सुटली. त्यामुळे घरची जबाबदारी रोहितवरती पडली होती. तेव्हा तो इंडियन ऑईल आणि रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेट खेळत असायचा.
-रोहित जरी महाराष्ट्रीयन असला, तरी त्याची आई विशाखापट्टणममध्ये वाढली होती. त्यामुळे रोहित हिंदी, इंग्लिश, तेलुगु आणि मराठी या भाषा बोलू शकतो.
-रोहित सुरुवातील खिरकी गोलंदाजी करत असायचा. त्याचा रणजी ट्रॉफी मुंबई संघातील संघसहकारी सिद्धेश लाड याचे वडील प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्यातील कौशल्य हेरले आणि त्याला फलंदाजीचे प्रशिक्षण दिले.
-रोहित सुरुवातील क्रिकेट खेळत असताना त्याच्या शाळेतील स्कॉलरशीपच्या पैशाने क्रिकेट फी भरत असे.
-रोहितने त्याचा क्रिकेट आदर्श विरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी शाळा बुडवली होती.
-रोहित हा शाकाहारी कुटुंबातील आहे. परंतु, त्याला अंडे खायला खूप आवडतात. एकदा रोहितने त्याच्या मित्रांसोबत न थांबता 50 अंडे खाण्याची शर्यत लावली होती.
-2005-07साली सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत रोहितने मुंबई विरुद्ध गुजरात मधील सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. यावेळी त्याने 45 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 101 धावा केल्या होत्या. यासह टी20त शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला.
-रोहित 2007-08मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी त्याने तिथे 1.5 लाखाची खरेडी केली होती.
-मेलबर्नमधील बांग्लादेशविरुद्धच्या विश्वचषकात रोहितने नाबाद 137 धावा करत सामना विजयात हातभार लावला होता. यामुळे आयसीसी विश्वचषक इतिहासात नाबाद शतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्याच्यापुर्वी अशी कामगिरी सौरव गांगुलीने 2003मध्ये केन्याविरुद्ध केला होती.
-वनडेत 2 वेळा द्विशतक करणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे.
-रोहितच्या वनडेतील सर्वोत्कृष्ट धावा या नामिबिया, पूर्व आफ्रिका, यूएसए आणि हाँगकाँग या आंतरराष्ट्रीय संघाच्या धावांच्या तुलनेत जास्त आहेत.
-रोहितचा 45 हा आवडता क्रमांक आहे. फक्त त्याच्या जर्सीचा क्रमांक 45 नाही, तर तो कार रजिस्ट करतनाही त्याच क्रमांकाने करतो.
-रोहित त्या 4 आयपीएल खेळाूंपैकी एक आहे, जे 2 वेगवेगळ्या संघाकडून खेळले आहेत. तो डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याच्याव्यतिरिक्त 2 संघाकडून आयपीएल खेळणारे खेळाडू लक्ष्मीपथी बालाजी, प्रज्ञान ओझा आणि यूसुफ पठाण हे आहेत.
-रोहित बेंगलोरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेतील 209 आणि कोलकातामधील श्रीलंकाविरुद्धच्या 264 धावांसाठी ओळखला जातो.
-रोहितने 2014मध्ये सर्कसमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या पीइटीए यांच्याबरोबर आपला सहभाग नोंदवला होता.