---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर सचिन तेंडुलकर

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 1:17 PM
sachin hundred
---Advertisement---

संपुर्ण नाव-  सचिन रमेश तेंडुलकर

जन्मतारिख- 24 एप्रिल, 1973

जन्मस्थळ- बॉम्बे (आताचे मुंबई), महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, मुंबईस मुंबई इंडियन्स आणि यॉर्कशायर

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- पाकिस्तान विरुद्ध भारत, तारिख- 15 ते 20 नोव्हेंबर, 1989

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- पाकिस्तान विरुद्ध भारत, तारिख- 18 डिसेंबर, 1989

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, तारिख- 1 डिसेंबर, 2006

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी: सामने- 200, धावा- 15921, सरासरी- 53.78

गोलंदाजी: सामने- 200, विकेट्स- 46, सर्वोत्तम कामगिरी- 3/10

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी: सामने- 463, धावा- 18426, सरासरी- 44.83

गोलंदाजी: सामने- 463, विकेट्स- 154, सर्वोत्तम कामगिरी- 5/32

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी: सामने- 1, धावा- 10, सरासरी- 10.00

गोलंदाजी: सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1

थोडक्यात माहिती- 

-सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील सर्वजण अभिनेता देवानंदचे चाहते होते. त्यातही देवानंद यांच्या ‘गाईड’ या सिनेमाने सर्वांना वेड लावले होते. या सिनेमातील संगीत अत्यंत गाजले होते आणि ते संगीत देणाऱ्या सचिन देव बर्मन यांच्या गाण्याचे नितीन आणि अजित तेंडुलकर (सचिनचे भाऊ) चाहते होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लहान भावाचे नाव सचिन असे ठेवले.

-सचिनला अनेक मित्र आहेत. त्यापैकी एक आहे, तो विनोद कांबळी. हे दोघेही शाळेपासूनचे मित्र आहेत. या दोघांनीही 1987मध्ये बॉलबॉयचे कामही केले होेते.

-सचिनला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याने आपल्या वयाच्या 16व्या वर्षी  1989मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सचिनला घातक गोलंदाजांच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागले होते.

-सचिनला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही आवडत असे. तो ऑफ ब्रेक गोलंदाजी करायचा. त्याने सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मर्व्ह ह्युज आणि क्रेग मॅकडरमॉट या प्रमुख गोलंदाजांना हादरवले होते. 

-सचिनने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1, कसोटीत 46 आणि वनडेत 154 विकेट्स घेतल्या आहेत.

-सचिन तेंडुलकर हा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो आतापर्यंतचा कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर त्याला क्रिकेटचा आयकॉन म्हणूनही ओळखले जाते.

-सचिनने आंतरराष्ट्रीय 100 शतकांचा टप्पाही पार केला आहे. यामध्ये कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर नाबाद 248 धावांची खेळी सचिनची फलंदाजीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

-ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनची फलंदाजी पाहुन म्हटले होते की, सचिनला खेळताना पाहिल्यावर मला माझी फलंदाजी आठवते.

-सचिन इतका नम्र होता की, त्याचा पंचांना कोणताही त्रास झाला नाही. सामन्यात पंचांचा निर्णय जर चुकला तरी तो आक्राळस्तपणे वागत नव्हता. 2011च्या विश्वचषकात विंडीजविरुद्ध सामन्यात रामपालचा चेंडू सचिनच्या बॅटच्या हॅण्डला लागून यष्टीरक्षकाकडे गेला होता. यावेळी गोलंदाजाने अपील केले असता पंचांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु सचिन पव्हेलियनकडे निघाला होता.

-सचिनला वेगाचीही आवड होती. त्याकडे अनेक गाड्या आहेत. त्याला लांबचा प्रवास आणि वेगात गाडी चालवायला आवडते. त्यासाठी तो रात्रीचा अशा प्रवासाला जातो. मुलं लहान असताना तो रोज हमखास त्यांना गाडीतून एक चक्कर मारून आणायचा (वेगात नाही).

-2014मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वयाच्या 40व्या वर्षी ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारा सचिन हा सर्वात तरुण व्यक्ती आहे. तसेच ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळविणारा सचिन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सचिन वाढदिवस विशेष लेख –
सचिन ९२वर खेळतोय रे…!!
सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…
खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---