संपुर्ण नाव- सदागोपन रमेश
जन्मतारिख- 16 ऑक्टोबर, 1975
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिलनाडू
मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 28 ते 31 जानेवारी, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 30 मार्च, 1999
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 19, धावा- 1367, शतके- 2
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 24, धावा- 646 , शतके- 0
गोलंदाजी- सामने- 24, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/23
थोडक्यात माहिती-
-सदागोपन रमेश यांनी वयाच्या 10व्या वर्षी टेनिस चेंडूसह क्रिकेट खेळायला सुरुवात केला होती.
-त्यांनी 13 वर्षांखालील क्रिकेटच्या निवडीच्या सामन्यात फिरकी गोलंदाजी केली होती. यावेळी त्यांना एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे त्यांची संघात निवड झाली नव्हती. म्हणून त्यांनी पुढे ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याचे ठरवले. यामुळे त्यांची 16 वर्षांखालील संघात निवडही झाली होती.
-1999मध्ये कोका कोला चषक वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज निक्सन मॅकलिन यांची पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेत, रमेश यांनी विक्रम केला होता. त्यांचा हा विक्रम पुढे भुवनेश्वर कुमारने मोडला.
-याच सामन्यात वेस्ट इंडिजचे गोलंदाज वेव्हल हिंड्स यांनीही पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. त्यामुळे तो एकमेव असा वनडे सामना ठरला ज्यात 2 गोलंदाजांनी पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती.
-गोलंदाजी व्यतिरिक्त रमेश हे फलंदाजीतही माहिर होते. त्यांनी 1995ला हैद्राबादविरुद्ध प्रथम श्रेणीचा पहिला सामना खेळताना पहिल्या डावात 59 आणि दुसऱ्या डावात 132 धावा केल्या होत्या.
-1998-99चे वर्ष रमेश यांच्यासाठी भाग्यशाली ठरले. यावेळी त्यांचा फॉर्मही चांगला होता. तसेच नवजोत सिंग सिद्धू यांनीही भारतीय संघातून निवृत्ती घेतल्याने रमेश यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली.
-रमेश यांच्या कसोटी पदार्पणातील कामगिरीला पाहता संघाचे कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांनी खूश होऊन रमेश यांना मिठी मारली होती. एवढेच नाही तर त्यांना शूजही भेट दिले होते. मात्र, भारताने ती कसोटी गमावली होती.
-रमेश यांनी त्यांच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पहिल्या डावात 60 आणि दुसऱ्या डावात 96 धावा करत त्यांनी भारताच्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली होती. हाच सामना एका डावात 10 विकेट्स घेत भारताचे गोलंदाज अनिल कुंबळे यांनीही गाजवला होता.
-रमेश यांना 1999च्या विश्वचषकात खेळण्याचीही संधी मिळाली होती. यावेळी त्यांनी 5 सामने खेळत 28.80च्या सरासरीने 144 धावा केल्या होत्या. यावेळी झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव सामन्यात त्यांनी अर्धशतक केले होते.
-2001ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेन वॉर्नचा झेल पकडत रमेश यांनी हरभजन सिंगला त्यांची हॅटट्रिक पूर्ण करण्यात मदत केली होती.
-रमेश यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका गाजवली होती. 2001साली श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी 37.16च्या सरासरीने 223 धावा केल्या होत्या. यामुळे ते त्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे दुसरे भारतीय फलंदाज ठरले होते.
-2002 साली रमेश यांनी अपर्ना यांच्याशी लग्न केले. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगीही आहे.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रमेश अभियन क्षेत्राकडे वळले. त्यांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत त्यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. 2008मध्ये रमेश यांनी एम राजा यांच्यासह संतोष सुब्रमन्यम हा तमिळ चित्रपटात काम केले.
-2011मध्ये त्यांनी पोट्टा पोट्टी या चित्रपटातही मुख्य भूमिका साकरली होती.