---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर सलील अंकोला

On: मंगळवार, मार्च 1, 2022 3:50 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- सलील अशोक अंकोला

जन्मतारिख- 1 मार्च, 1968

जन्मस्थळ- सोलापूर, महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत, महाराष्ट्र आणि मुंबई

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख -15 ते 20 नोव्हेंबर, 1989

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 18 डिसेंबर, 1989

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 1, धावा- 6, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/35

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 20, धावा- 34, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 20, विकेट्स- 13, सर्वोत्तम कामगिरी- 3/33

थोडक्यात माहिती-

-महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेल्या सलील अंकोला यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचा योगायोग चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याशी जुळला होता.

-1989ला झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यातून सचिन आणि अंकोलाने एकत्र पदार्पण केले होते.

-एवढेच नव्हे तर, त्यांनी 28 डिसेंबर 1989ला वनडे पदार्पणही पाकिस्तानविरुद्धच्या एकाच सामन्यातून केले होते. यावेळी अंकोला यांनी पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानचे क्रिकेटपटू इमरान खान यांना बाद करत इतिहास रचला होता.

-त्यानंतर पुढे 24 वर्षात सचिन यांनी 199 कसोटी सामने खेळत 34000 पेक्षाही अधिक धावा केल्या. ते जगातील सर्वोत्तम फलंदाजही ठरले आहेत. मात्र, सलील यांनी केवळ 20 वनडे आणि पदार्पणाचा केवळ 1 कसोटी सामना खेळला. यातही त्यांना फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नव्हती.

-महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे सलील यांनी मध्य प्रदेशविरुद्ध 9 विकेट्स घेत भारताच्या वेगवान गोलंदाजीचे उज्वल भविष्य म्हणून नावलौकिक मिळवला होता. मात्र, पुढे त्यांची गोलंदाजी जास्त चमकू शकली नाही.

-त्यांचा 1996मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. पण त्यानंतर त्यांनी 1997 मध्ये 28 वर्षांच्या वयात अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

-2000 साली त्यांनी संजय दत्त यांच्या कुरुक्षेत्र चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर, 2002 साली पिता चित्रपटात काम केले.

-पुढे 2003 सालचा इशा देओल आणि झायेद खान यांच्यासोबतचा चुरा लिया है तुमने हा चित्रपट त्यांच्यासाठी हिट ठरला.

-पुढिल वर्षात सलील यांनी सायलेन्स प्लिज, द ड्रेसिंग रूम या चित्रपटात कर्णधाराची भूमिका साकारली होती.

-चित्रपटांशिवाय ते बिग बॉस, 2006 साली बिग ब्रदर अशा रिऍलिटी शोमध्येही दिसले आहेत.

-तसेच टिव्ही सिरियल्स जसे की शूss.. कोई है आणि कोरा कागजमध्येही त्यांनी काम केले आहे.

-2008 साली औदासिन्याच्या दबावामुळे त्यांना पुणे येथे ऍडमीट करण्यात आले होते. यामागचे कारण त्यांचे दारूचे व्यसन हे होते. त्यामुळे त्यांची पत्नी परिनीता अंकोला या आपल्या माहेरी निघून गेल्या होत्या.

-2010मध्ये ते नीट होताच त्यांच्या पत्नी परत सासरी स्थित झाल्या. मात्र, 2011 साली त्यांचा घटस्फोट झाला. पुढे 2013मध्ये त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली.

-पुढे अंकोला यांनी रिया बॅनर्जी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना सना अंकोला नावाची मुलगीही आहे.

-फेब्रुवारी 2013मध्ये सलील हे सावित्री या सिरियलमध्ये सावित्रीच्या वडिलांची भूमिका करत होते. मात्र, ऑगस्टमध्ये त्यांच्या ऐवजी शाहबाज खान यांना ह्या भूमिकेसाठी संधी देण्यात आली.

– सध्या ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीचे अध्यक्ष आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---