संपुर्ण नाव- समीर सुधाकर दिघे
जन्मतारिख- 8 ऑक्टोबर, 1968
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 18 ते 22 मार्च, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 10 जानेवारी, 2000
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 141, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 256, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-समीर दिघे हे यष्टीरक्षक फलंदाज आहेत. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत फलंदाजी आणि यष्टीरक्षण दोन्हीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
-1990-91च्या मोसमात गुजरातविरुद्धच्या सामन्यातून रणजी ट्रॉफीत पदार्पण करणारे दिघे यांनी सुरुवातीलाच शतकी खेळी केली होती. यावेळी मुंबईकडून सलामीला फलंदाजी करताना त्यांनी 107 धावा करत एका डावाच्या आघाडीवर तो सामना जिंकला होता.
-त्यांनी पुढील सौराष्ट्रविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यातही सलामीला फलंदाजी करत त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावा (153) केल्या होत्या. यासह त्यांच्या 1990-91च्या मोसमात 6 डावात एकूण 440 धावा झाल्या होत्या. यात त्यांच्या एका अर्धशतकाचा आणि 2 शतकांचा समावेश होता.
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिघे यांनी मुंबईकडून एकूण 58 सामने खेळले. ज्यात त्यांनी 3054 धावा केल्या. तर यष्टीमागे 176 झेल झेलले आणि यष्टीमागे 23 फलंदाजांना यष्टीचीत केले.
-शिवाय 1999-2000 साली मोहम्मद अझिरुद्दीन यांच्या हैद्राबाद संघाला पराभूत करत, दिघे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने त्यासालचा रणजी ट्रॉफीही पटकावली होती.
-हा दिघे यांचा कर्णधार असतानाचे पहिले विजेतेपद होते. तर, 1996-97पासून संजय मांजरेकरांच्या नेतृत्त्वानंतर हे मुंबईचेही पहिलेच विजेतेपद होते.
-वयाच्या 30व्या वर्षी जेव्हा दिघे यांना राष्ट्रीय संघ निवडीच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. मात्र, 1999-2000 साली त्यांना वनडेत तर 2001 साली कसोटीत खेळण्याची अनपेक्षित संधी दवडून आली होती.
-2001 साली प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरु्द्धच्या सामन्यातून दिघे यांनी कसोटी पदार्पण केले होते. यावेळी त्यांना विशेष धावा घेता आल्या नव्हत्या. मात्र, या सामन्यात सचिन तेंडूलकरने 126 धावा तर हरभजन सिंगने 8 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-वनडेत दिघे यांनी यष्टीरक्षक फलंदाजाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट धावांचा विक्रम केला होता. त्यांचा हा विक्रम पुढे केवळ राहुल द्रविड आणि एमएस धोनीने मोडला. दिघे यांनी झिम्बाब्वे विरुद्धच्या कोका कोला चषकाच्या अंतिम सामन्यात 96 चेंडूत 94 धावा केल्या होत्या.
-2000 सालच्या भारतीय यष्टीरक्षकांच्या संघर्षात दिघे यांच्यासह अजय रात्रा, पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक आणि एमएस धोनी यांचाही समावेश होता.
-वयाच्या 33व्या वर्षी निवृत्तीनंतर दिघे हे प्रशिक्षण क्षेत्राकडे वळले.
-त्यांनी त्रिपुरा, हाँगकाँग, भारत अ आणि भारत ब्लू संघाचे प्रशिक्षण केले आहे.
-दिघे हे आयपीएल 2008च्या मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते.
-शिवाय ते एमसीएच्या सुधारित समितीचेही निवडकर्ता होते.