संपुर्ण नाव- संजय विजय मांजरेकर
जन्मतारिख- 12 जुलै, 1965
जन्मस्थळ- मंगलोर, म्हैसूर
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -25 ते 29 नोव्हेंबर, 1987
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 5 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 37, धावा- 2043, शतके- 4
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 74, धावा- 1994, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 74, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/02
थोडक्यात माहिती-
-संजय मांजरेकर हे माजी भारतीय फलंदाज विजय मांजरेकर आणि रेखा मांजरेकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांची आई रेखा ह्या दक्षिण-भारतीय महिला होत्या.
-त्यांचे वडील विजय यांनी भारताकडून कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्याकाळात त्यांनी 55 कसोटी सामन्यात 3 हजाराहून अधिक धावा केल्या होत्या. शिवाय त्यांच्या प्रथम श्रेणीतील धावांचा आकडाही 12 हजारापेक्षा जास्त होता. त्यांचा ऑक्टोबर 1983मध्ये मृत्यू झाला.
-मांजरेकर यांचे चुलत आजोबा दत्ताराम हिंदलेकर यांनीदेखील स्वातंत्र्यापुर्वी भारताकडून क्रिकेट खेळले होते.
-मांजरेकरांच्या पत्नीचे नाव देविका असे आहे. तर, त्यांना देविका आणि सिद्धार्थ अशी मुले आहेत.
-मांजरेकर हे प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे खूप मोठे चाहते आहेत.
-त्यांनी शालेयवयापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 1985 साली त्यांनी मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते.
-त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक त्यांनी 1986 साली बडोदाविरद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात केले होते. तर, 1987 साली पश्चिम विभागाकडून त्यांनी केलेल्या द्विशतकाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली.
-मांजरेकरांनी 1987-88 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक त्यांनी 1989 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत केले होते.
-त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी 1989 सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत केली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दोन्ही डावात त्यांनी शतक ठोकण्याचा कारनामा केला होता.
-मांजरेकर यांच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदलेला आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1992 साली झिम्बाब्वेविरुद्ध सर्वात हळूवार शतक करण्याचा नकोसा विक्रम केला होता. हे शतक त्यांनी 500 मिनिटात केेले होते. विशेष म्हणजे, हे त्यांनी केलेले चौथे हळूवार शतक आणि कसोटीतील त्याचे शेवटचे शतक होते.
-1996 साली कसोटी आणि 1998 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली.
-निवृत्तीनंतर मांजरेकर यांनी बराच काळ समालोचकाचे काम केले. परंतु, मार्च 2020मध्ये मांजरेकरांच्या कामगिरीवर नाखूश असल्याने बीसीसीआयने त्यांना समालोचक पॅनेलमधून काढून टाकले आहे.
-विशेष म्हणजे मांजरेकर यांनी इंडिपॉप अल्बम रेस्ट डे मध्ये काम केले आहे.
-2018 साली मांजरेकर यांचे इमपरफेक्ट हे आत्मचरित्र प्रकाशित झाले.