संपुर्ण नाव- संजीव कुमार शर्मा
जन्मतारिख- 25 ऑगस्ट, 1965
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली, रेल्वे आणि राजस्थान
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख -2 ते 6 डिसेंबर, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 2 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 56, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 3/37
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 80, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 23, विकेट्स- 22, सर्वोत्तम कामगिरी- 5/26
थोडक्यात माहिती-
-उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज संजीव कुमार शर्मा यांनी दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली 1988मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी 37 धावा देत 3 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1990मध्ये त्यांनी दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला. यावेळीदेखील इंग्लंडच्या 3 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केला होता.
-1988 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत शर्मा यांनी एका डावात 26 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-शर्मा यांनी भारताकडून जास्त सामने खाळले नाहीत. मात्र, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्या आयुष्याची 2 दशके घालवली होती. 1984-84साली त्यांनी दिल्लीकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यानंतर पुढे 20 वर्षांच्या काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 235 विकेट्स घेतल्या होत्या.
-नोव्हेंबर 2004मध्ये शर्मा यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-ते आता नवी दिल्लीतील हरीनगर येथील संजीव शर्मा क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच, रणजी ट्रॉफीतील दिल्ली संघाचेही प्रशिक्षक होते.
-दिल्ली संघाचे प्रशिक्षण करताना शर्मा यांनी विरेंदर सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्मा, विराट कोहली, अमित मिश्रा आणि उनमुक्त चंद यांना तयार केले आहे.
-जेव्हा भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा यांना चेंडू लागल्याने दवाखान्यात होते, तेव्हा संजीव शर्मा आणि मनोज प्रभाकर त्यांच्यासोबत होते.